Home बुलडाणा अबब,ठाणेदार साहेबांचा कुत्रा हरवला, ???

अबब,ठाणेदार साहेबांचा कुत्रा हरवला, ???

623

अबब,ठाणेदार साहेबांचा कुत्रा हरवला, ???

पोलीस उप निरीक्षकांनी सोशल मीडिया वर टाकली पोस्ट !

कुत्रा शोधून देणाऱ्यास मिळणार बक्षीस ,

सर्वत्र शोध सुरू ,

अमीन शाह

बुलडाणा ,

डोणगांव येथील ठाणेदार दीपक पवार यांचा कुत्रा हरवल्या बद्दल सोशल मीडियावर माहिती टाकत कुत्रा आणून देण्याऱ्यास उचित बक्षिस देण्यात येनार असल्याचा संदेश येथील पोलीस उपनिरीक्षकाने टाकल्याने आता काही लोकांनी या उभ्या कानाच्या कुत्र्याचा शोध घेण्यास सुरुवात केली असून परिसरात मात्र पोलिसांचा कुत्रा हरवल्याची चर्चा रंग धरू लागली आहे .

एकीकडे उत्तर प्रदेशमध्ये २०१४ ला एका मंत्र्यांच्या म्हशी हरवल्या व त्यानंतर म्हशी पाहण्यासाठी पोलिसांची दमछाक झाली होती व प्रकरणाची चर्चा संपूर्ण देशात झाली होती अश्यात आता डोणगांव मध्ये सध्या सोशल मीडियावर ठाणेदाराचा कुत्रा हरवल्याची चर्चा रंगात आली कुत्रा हरवल्याची माहिती खुद्द पोलीस उपनिरीक्षक शिवाजी राठोड यांनीच टाकल्याने चर्चेला उधाण आले.
डोणगांव येथील ठाणेदार यांच्याकडे जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा असून आठ ते दहा दिवसा पूर्वी हा कुत्रा बाहेर फिरण्या साठी सोडला असता परत आला नाही तेव्हा चिंतीत पोलीस उपनिरीक्षक शिवाजी राठोड यांनी काही सोशल मिडिया व्हाट्सएपच्या ग्रुपवर माहिती टाकली की ठाणेदार पवार साहेब यांचा टायगर नावाचा कुत्रा हरवला आहे तो आणून देणाऱ्यास उचित बक्षीस देण्यात येईल या मेसेजने कित्येकांना उत्तर प्रदेश येथे २०१४ मध्ये मंत्राच्या म्हशी हरवल्या नंतर त्या सापडुन देण्या साठी पोलिसांची दमछाक झाली होती त्याची आठवण झाली मात्र येथे ठाणेदाराचाच कुत्रा हरवला आहे तेव्हा दाद मागायची कोणी व कोठे हा प्रश्न जणते समोर निर्माण झालेला आहे तर या प्रकरणी पोलीस वीभागाकडून माहिती घेतली असता पोलीस स्टेशन मध्ये कुत्रा हरवल्याची कोणत्याच प्रकारे नोंद नसल्याची माहिती मिळाली .

लाडका कुत्रा ???

या संदर्भात पोलीस उपनिरीक्षक राठोड यांच्याशी संपर्क साधला असता मिळालेल्या माहिती नुसार टायगर नावाचा हा हरवलेला कुत्रा ठाणेदार साहेबांचा जिवलग व लाडका कुत्रा होता सोशल मीडिया वर पोस्ट पाहताच येथील काही युवकांनी हरवलेल्या कुत्र्याला शोधण्यासाठी शोध कार्य सुरू केले आहे ,