Home महत्वाची बातमी धक्कादायक प्रकार, उंदीर चावल्याने तरुणाचा मृत्यू

धक्कादायक प्रकार, उंदीर चावल्याने तरुणाचा मृत्यू

19

अमीन शाह

पुण्यातील ससून रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या तरुणाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाला. या प्रकारामुळे नातेवाईकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. सागर रेणूसे (30) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. भोर तालुक्यातील सागर 16 मार्चला अपघात झाल्याने ससूनमध्ये आला होता. मात्र 26 मार्चला त्याची तब्येत खालावली. नंतर आयसीयुमध्ये त्याच्या डोक्याला, कानाला आणि इतर अवयवांना उंदराने चावा घेतल्याचे उघड झाले. प्रकृती खालावल्याने आज सकाळी त्याचं निधन झालं.