Home जळगाव समाजात परिवर्तन घडवण्याची ताकद शिक्षकात – राकेश शर्मा

समाजात परिवर्तन घडवण्याची ताकद शिक्षकात – राकेश शर्मा

55

साहित्य भारतीतर्फे गुरूपूजन कार्यक्रम

अमळनेर – समाजाच्या उभारणीत शिक्षकाची भुमिका अतिशय महत्त्वाची मानली जाते.समाजाला दिशादर्शन करण्याचे काम शिक्षक वर्गाकडून अपेक्षित असते. शिक्षकांच्या योगदानातून समाज जीवनात झालेल्या परिवर्तनाची अनेक उदाहरणे आपल्या इतिहासात आहेत. आपल्या संस्कृतीत तर उज्वल गुरू शिष्य परंपरा आहे असे प्रतिपादन रा.स्व.संघाचे शहर सहकार्यवाह श्री राकेश शर्मा यांनी केले. साहित्य भारती अमळनेर व योगीराज मॅथेमॅटीक्स क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुरूपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने भाषा विषयाच्या सेवानिवृत्त गुरुजनांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा.एन.के.कुलकर्णी,प्रा.नरेंद्र सोनवणे व गिरीष डहाळे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. विवेक जोशी यांनी प्रास्ताविक केले. सौ.करूणा सोनार यांनी गुरूचा महिमा वर्णन करणारी कविता सादर केली.
श्री राकेश शर्मा यांनी आपल्या भाषणात भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये,आजच्या काळात असलेली उपयुक्तता याबाबत विविध उदाहरणे देऊन अभ्यासपूर्ण विवेचन केले. शिक्षकांच्या मार्गदर्शनातून सकस व दर्जेदार साहित्य निर्मिती होऊ शकते. सेवानिवृत्त शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे आवश्यक प्रशिक्षण घेऊन समाज माध्यमातून आपले विचार मांडले पाहिजेत. शिक्षकात परिवर्तन घडवण्याची ताकद असते आणि त्यातून देशाचा,समाजाचा विकास साधला जातो असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रेखा मराठे तर आभार प्रदर्शन दिनेश नाईक यांनी केले.
कार्यक्रमास समरसता साहित्य परिषदेचेे प्रांत कार्यवाह नरेंद्र निकुंभ,प्रा.एस.एस.पाटील,प्रा.भरतसिंग परदेशी,विजय बोरसे,आर.व्ही.पाटील आदींची उपस्थिती होती.

या गुरुजनांचा केला सन्मान – या कार्यक्रमात मराठी,हिंदी,इंग्रजी व संस्कृत या भाषांचे अध्यापन करणा-या सेवानिवृत्त गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. यात प्रा.डॉ.प्र.ज.जोशी,प्रा.डॉ.सुरेश माहेश्वरी  प्रा.सौ.शैलजा माहेश्वरी, प्रा.गोपाल शर्मा   प्रा.एन.के.कुलकर्णी, प्रा.नरेंद्र सोनवणे, प्रा.शीला पाटील , प्रा.अलका बोरसे  प्रा.एस.बी.साळुंखे, श्री भानुदास नेरकर,श्री प्रकाश लांडगे,सौ.अपर्णा वैद्य यांचा सन्मान करण्यात आला.

यांनी घेतले परिश्रम – कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगेश काळकर,दिपक खोंडे,मिनाक्षी बारी,अभिषेक पाटील यांनी परिश्रम घेतले.