Home वाशिम बस, रेल्वे मधुन बँग व मोबाईल चोरी करणारा अट्टल चोराला स्थनिक गुन्हे...

बस, रेल्वे मधुन बँग व मोबाईल चोरी करणारा अट्टल चोराला स्थनिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी ठोकल्या बेड्या

85

 

फुलचंद भगत
वाशिम:-वाशिम जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षात वाशिम पोलीसांकडुन धडक मोहिमा राबवुन वाशिम जिल्ह्यात गुन्हे करणारे गुन्हेगार यांना अटक करुन बेड्या ठोकल्या आहेत. तसेच वाशिम मध्ये खिसा कापुन पैसे चोरी करणारे आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्यात आले आहे.
दिनांक 09/01/2026 रोजी फिर्यादी नामे रामदास तुकाराम सर्जेराव रा पिंपळशेंडा ता मालेगांव जि वाशिम हे मालेगांव येथुन वाशिम कडे बसने येत असता वाशिम शहर येथील अकोला नाका येथे यांचे खिश्यामधुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने रोख रक्कम 28,600/- रुपये चोरुन नेले. त्यावरुन पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे अप क्र 28/2026 कलम 303 (2) भा.न्या. सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांनी एक टिम तात्काळ तयार करुन वाशिम शहर परीसरात रवाना केली. स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम येथील टिम ने घटनास्थळा जवळील तसेच परीसरातील बरेच सिसिटीव्ही चेक केले. त्यावरुन सदर आरोपी निष्पन्न करुन तो वाशिम येथे राहत असल्याचे समजले. त्याचा शोध घेतला परंतु सदर आरोपी हा बाहेर गांवी असल्याने व वारंवार आपला पत्ता बदलत असल्याने तो मिळत नव्हता. दिनांक 01/05/2026 रोजी सदर आरोपीची माहिती घेतली असता यातील आरोपी हा पुन्हा चोरी करण्याकरीता वाशिम येथे आला आहे अश्या गोपनिय माहिती मिळाल्या वरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने वाशिम शहरात सापळा रचुन यातील आरोपी यास अकोला नाका परीसर वाशिम येथुन मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले. त्यास त्याचे नांव विचारले असता त्याने त्याचे नांव राजकुमार उर्फ साधु कडु डोडे वय 33 वर्ष रा. नेपानगर जि. बुऱ्हाणपुर (मध्यप्रदेश) असे सांगीतले वरुन त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांने वाशिम येथे येवुन वरील फिर्यादीच्या खिश्यातुन गर्दीचा फायदा घेवुन नगदी 28,600/- रुपये चोरुन नेल्याची कबुली दिली. त्याचे कडुन गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल नगदी 9,500/- रुपये व विविध कंपण्याचे एकुन 13 मोबाईल किंमत अंदाजे 1,95,000/- रुपये तसेच सोने 3 ग्रॅम व 16 तोळे चांदी किंमत अं. 95,000/- रुपये असा असा एकुन 2,99,500/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच सदर आरोपीने आणखी नांदेड, भुसावळ, वाशिम शहर येथे मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. सदर आरोपीस पोलीस स्टेशन वाशिम शहरच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास चालु असुन सदर आरोपीने आणखी कोठे कोठे चोऱ्या केल्या याबाबत माहिती घेणे सुरु आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदिप अगरवाल, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, पोउपनि/ निलेश जाधव व टिमने अथक परीश्रम घेतले आहे.