Home बुलडाणा एक कोटी बत्तीस लाख रुपयांची अंमली पदार्थाची कारवाई यशस्वी केल्याबद्दल ठाणेदार गजानन...

एक कोटी बत्तीस लाख रुपयांची अंमली पदार्थाची कारवाई यशस्वी केल्याबद्दल ठाणेदार गजानन करेवाड पोलीस महानिरीक्षककांच्या हस्ते सन्मानित ,

121

अमिन शाह

बुलडाणा – जिल्ह्यातील संवेदनशील गांवापैकीच एक असलेल्या साखरखेर्डा शहरात सामाजिक सलोखा आबाधित ठेवण्यासाठी क्षुल्लक कारणावरून बदलीस बळी पडलेल्या तत्कालीन ठाणेदार स्वप्निल नाईक यांच्या नंतर यवतमाळ जिल्ह्य़ातून बदलून आलेल्या सहा पोलीस निरीक्षक गजानन दिगंबराव करेवाड यांना साखरखेर्डा पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आले. तद्नंतर धडाकेबाज कारवाया करून ठाणेदारांना अंमल पदार्थाची दिमाखदार कारवाई यशस्वी करून एक कोटी बत्तीस लाख रुपयांचा माल हस्तगत केल्याबद्दल पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी दि. 29 एप्रिल रोजी ठाणेदार गजानन करेवाड यांसह जिल्ह्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
दि. २९जुलै ०२४ ला साखरखेर्डा पोलीस ठाण्याचा कार्यभार अल्पशा कर्मचाऱ्यांची उणीव असताना देखील मोठ्या धाडसाने करेवाड यांनी शिरसावंद्य पेलत कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय व लोकाभिमुख म्हणून त्यांनी आपली छबी उमटवली आहे. करेवाड यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर पोलीस खात्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. साधेपणा, स्पष्ट वक्तेपणा, कठोर शिस्त आणि तरीही माणुसकीची जाण या गुणांचा सुरेख संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पाहायला मिळतो. पोलीस दलातील अधिकारी म्हणजे केवळ कायदा राबवणारा नसून तो समाजाचा मार्गदर्शक, रक्षक आणि संकटात धावून जाणारा आधारस्तंभ असतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून वारंवार सिद्ध केले आहे. थेट जनतेशी संवाद, स्थानिक समस्या समजून घेणे आणि त्या मुळापासून सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. कोणतीही घटना असो, चोरी, मारामारी, अवैध व्यवसाय, सामाजिक तणाव किंवा अपघात ठाणेदार करेवाड हे घटनास्थळी स्वतः उपस्थित राहून परिस्थिती हाताळणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात.
त्यांच्या कार्यकाळात साखरखेर्डा परिसरात गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आले आहे.
कायद्याचा धाक निर्माण करतानाच, सामान्य नागरिकांच्या मनातील पोलीसांविषयीची भीती कमी करून विश्वासाचे नाते निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे आज साखरखेर्डा पोलीस स्टेशन म्हणजे केवळ तक्रार नोंदवण्याचे ठिकाण न राहता, न्याय, संरक्षण आणि मार्गदर्शनाचे केंद्र बनले आहे.
त्यांनी हरियाना केंद्र बिंदू असलेल्या पाईप चोरीचा पर्दाफाश करून सदर टोळी गजाआड करून लाखो रुपयांचा ऐवज जप्त करुन पाच आरोपींना अटक केली आहे. तर कुख्यात गुंड जखमेश्वर उर्फ शेनफड शिंदे याच्या मुसक्या आवळल्या, गतवर्षी ४४ जुगार अड्ड्यावर तर १४४ दारू अड्ड्यावर छापे घालून लाखोंचा ऐवज जप्त केला आहे,त्यांच्या धाडसी कार्यवाहीमुळे भाग पाच च्या गुन्ह्यात कमालीची घट झाली आहे. गावात दहशत निर्माण करणाऱ्या १४ आरोपींना तडीपार करून गांवात शांतता निर्माण करण्यासाठी नेटानं प्रयत्न केला आहे. जानेवारी ०२५ मध्ये सूतगिरणी परिसरात पडलेल्या दरोड्यातील आरोपींचा बारा तासात शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करून सर्व आरोपींना अटक केली आहे तर पेनटाकळी येथील खुनाचा कट उधळून लावत आरोपीस अटक केली आहे तर आठ घरफोडय़ा पैकी पाच घरफोडीतील तपास पूर्ण करून परिसरातील चौदा चोरीपैकी आठ चोरीच्या गुन्ह्याची उकल केली आहे. तर बलात्कार प्रकरणी दोन्ही गुन्हे उघड करून आरोपीस अटक केली आहे त्याच बरोबर फुस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा छडा लावून आरोपीस अटक केली आहे. त्यांच्या कार्यकाळात गणेशोत्सव, दुर्गोत्सव, बकरी इद असे सनोत्सव शांततेत पार पडले असून एकही जातीय दंगल झाली नाही. गणेशोत्सव काळात त्यांनी पुढाकार घेऊन कावसूचा आदर करणाऱ्या उत्कृष्ट गणेश मंडळांना पुरस्कार आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविले आहे.
प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याची भूमिका स्पष्टपणे समजावून देणे, वेळोवेळी मार्गदर्शन करणे आणि चांगल्या कामासाठी कौतुक करणे यामुळे संपूर्ण यंत्रणा अधिक प्रभावी झाली आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणारे पोलीस कर्मचारीही अधिक आत्मविश्वासाने आणि तत्परतेने काम करताना दिसतात. हेच त्यांच्या यशाचे खरे गमक आहे.