Home मुंबई संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

905

मुंबई, दि. ०७ : मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत उमरखेड-महागाव विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नंदनवन निवासस्थानी पार पडला.

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश पार पडल्याचे यावेळी सांगण्यात आले. ग्रामीण भागातील विकासकामे, सर्वसामान्य नागरिकांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क आणि समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची कार्यपद्धती यामुळे अनेक कार्यकर्ते शिवसेनेकडे आकर्षित होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी विधान परिषद आमदार दुष्यंत चतुर्वेदी, संपर्क प्रमुख श्रीधर काका मोहोड,जिल्हाप्रमुख यशवंत पवार ,चितंगराव कदम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये सूर्यकांता दिंडाळकर, दत्त दिगंबर वानखेडे, राहुल मोहितवार, राहुल वानखेडे, रामराव गायकवाड, मिलिंद धुळे, प्रफुल्ल खंदारे, विपीन पवार, विद्यानंद नलवाडे, पंजाबराव भालेराव, पी. सी. भोळे, रविंद्र जाधव, कैलासराव घुगरे, लक्ष्मण धुळे नामदेव शिगंणकर, श्री. दवणे, संताष चव्हाण, बाबुराव शिंदे, ज्ञानेश्वर कनवाळे, संताष वानखेडे, सचिन फळके, जगदिश सुरवशे, सचिन चव्हाण, भागवत कदम, बालाजी हुंबे, ओंकार मिराशे, ज्ञानेश्वर बोके, दयाराम बडेराव, चेतन कदम, सुनिल राठोड.प्रवीण धोपटे, सुर्यकांत पंडीत, विमलताई शिगणकर, किसन साखरे, सुरेश पाटील, विजय साखरे, रामदास वायकळे, पवन बरडे, शिवाजी कवडे, राजू साखरे, कैलास भुरके, दिपक केंदेकर, मिलिंद भोजु धुळे, मिलिंद हापसे, गौतम धुळे, राजु हाटकर, गोवर्धन धुळे, अनिकेत धुळे, शाम चेके, रघुनाथ खंदारे, संघदीप बरडे, संदिप इळजवार , किशोर इळजवार, विनोद बरडे, सदानंद इळजवार, ॲड. संतोष कांबळे, ॲड. राजिव भांगे पाटिल, भारत राठोड, संजय भालेराव, रुपेश जाधव, हिरासींग पवार, सचिन खंदारे, बबन काळभांडे, आशिष गावंडे, मिलींद चिकारे आणि नामदेवराव शिंगणकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता.

या पक्षप्रवेशामुळे उमरखेड-महागाव विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढणार असून आगामी काळात पक्ष आणखी बळकट होईल, असा विश्वास यावेळी मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला.आय