Home मराठवाडा पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या आंदोलनाला आले यश…!

पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या आंदोलनाला आले यश…!

159

पोलीसांचे DG लोनसाठी { गृहकर्ज अग्रिम } अखेर 1768.08 कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

धाराशिव  (  प्रतिनिधी ) – पोलीसांना घरे बांधण्यासाठी सन 2023 पासून प्रलंबित असलेले DG लोन { गृहकर्ज अग्रिम } अखेर 1768.08 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या बाबतचा शासन निर्णय दिनांक 12 / 05 / 2026 रोजी देण्यात आला !
या बाबत अधिक माहिती देताना प्रमोद वाघमारे यांनी सांगितले आहे की , पोलीसांना स्वतःचे हक्काचे घर बांधण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलातून सुमारे 4 ते 5 हजार पोलीस कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी यांनी सन 2023 रोजी DG लोन घेण्यासाठी अर्ज दाखल केले होते , परंतु दोन ते अडीच वर्षांचा कालावधी होऊनही DG लोन मंजूर करण्यात येत नव्हते , त्यामुळे पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे तसेच त्यांचे जिल्हाध्यक्ष यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाधिकारी / स्थानिक आमदार / पालकमंत्री यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस साहेब त्याच प्रमाणे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री स्व.अजित { दादा } पवार साहेब त्याच प्रमाणे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांना निवेदने देऊन सतत पाठपुरावा केला होता.
तसेच डिसेंबर 2025 मध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर भव्य मोर्चा काढून गृहराज्यमंत्री श्री.पंकज भोयर साहेब यांची भेट घेऊन त्यांना देखील निवेदन दिले होते , त्यावेळेस पंकज भोयर साहेबांनी राज्याच्या अप्पर गृहसचिव राधिका रस्तोगी मॅडम यांच्या सोबत पोलीस बॉईज असोसिएशनच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली होती.
अखेर पोलीस बॉईज असोसिएशनच्या या आंदोलनाला यश आले असून महायुती सरकारने DG लोन मंजूर केले असून त्यासाठी 1768.08 कोटी रुपये इतका निधी मंजूर केला असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी सांगितले आहे.

Previous articleजिद्द, चिकाटी आणि १७ तासांचा ‘एकांतवास’
editor
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.