Home महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाच्या सरचिटणीस पदी सुनिल जाधव यांची अविरोध...

महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाच्या सरचिटणीस पदी सुनिल जाधव यांची अविरोध निवड

42

महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाची महामंडळ शनिवार दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी शेगाव येथे पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष आदरणीय अर्जुनजी कोळी सर होते. व राज्याचे प्रभारी सरचिटणीस मा श्री किशोरजी पाडवी सरांच्या उपस्थितीत महामंडळ सभेमध्ये लोकशाही पद्धतीने राज्य सरचिटणीस पदी सुनिल जाधव( यवतमाळ) यांची तर राज्य उपाध्यक्ष पदी संजय आवळे( कोल्हापूर)यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ट्रस्ट च्या अध्यक्ष पदी शिवाजीराव राजिवडे, हिला आघाडी उपाध्यक्ष पदी प्रिया सिंग यांची तसेच नाशिक विभागीय अध्यक्ष म्हणून विकास तरटे यांची तर राज्य प्रसिद्ध प्रमुख पदी ओम गोखले यांची निवड करण्यात आली.यावेळी महामंडळ सभेला सर्व राज्य पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष व पदाधिकारी,विविध जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तथा शाखा अध्यक्ष व पदाधिकारी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सुनील जाधव यांची राज्य सरचिटणीस पदी निवड झाल्याचे राज्याध्यक्ष अर्जुन कोळी सर यांनी जाहीर केले.व पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.त्याचबरोबर कार्याध्यक्ष सुभाषराव कोल्हे सर, उपाध्यक्षा सौ.ज्योत्स्ना भरडा मॅडम, राज्य सहचिटणीस संजय चुनारकर,संपर्कप्रमुख विनोद चव्हाण,राज्य संघटक अन्वर सर , विदर्भ प्रमुख राजु बिराड सर ,प्रमोद लांगी सर , कोकण विभागीय अध्यक्ष वैभव पाटील , नाशिक विभागीय उपाध्यक्ष करनसिंग चव्हाण , शिरिष पवार संघटक संतोष राठोड, अमरावती विभाग उपाध्यक्ष नंदुरबार जिल्हाध्यक्ष सचिन आव्हाड डॉ.विनोद डवले,यवतमाळ शाखा अध्यक्ष धर्मा पवार,उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, घांटजी शाखा अध्यक्ष पडलवार सर अविनाश साखरकर, सिंधू सिडाम, स्वाती भोग, बोबडे सर, निंबाळकर सर तथा यवतमाळ जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. एका कर्तृत्वान पदाधिकाऱ्यांची महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाच्या राज्य सरचिटणीस पदी सुनील जाधव यांची नियुक्ती झाल्याबद्दल राज्यातील नगरपालिका महानगरपालिका शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.