Home विदर्भ राजकमल चौक,ईर्विन चौक,रवी नगर येथे घडलेल्या घटनेविरोधात शहराध्यक्ष बबलु शेखावत यांच्या नेतृत्वात...

राजकमल चौक,ईर्विन चौक,रवी नगर येथे घडलेल्या घटनेविरोधात शहराध्यक्ष बबलु शेखावत यांच्या नेतृत्वात पोलीस उपाआयुक्त व पोलीस निरीक्षक सिटी कोतवाली यांना निवेदन

41

मनिष गुडधे.

 अमरावती — काल ९ जुन २०२४ रोजी रात्रीला राजकमल चौक,इर्विन चौक,रवी नगर येथे लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार श्री.बळवंत वानखडे यांच्या विजयाचे लावलेले बॅनर – पोस्टर काही समाजकंटक व्यक्तींनी फाडले.ही बाब शहरातील सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था बिघडविण्याच्या प्रयत्न केला जातो आहे,याचा निषेध करण्यात करिता व यावर तातडीने कारवाई व्हावी या मागणी करिता पोलीस उपाआयुक्त व पोलीस निरीक्षक सिटी कोतवाली येथे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलु शेखावत यांच्या नेतृत्वात व काँग्रेस पक्षाच्या शिस्त मंडळाच्या उपस्थिती मध्ये निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.पोलीस उपाआयुक्त व पोलीस निरीक्षक सिटी कोतवाली यांना या गोष्टी पासुन अवगत करविले की,दि.०८/०६/२०२४ रोजी मा.पोलीस आयुक्तांना निवेदन दिले त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या शिस्त मंडळाला विनंती केली होती की, शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहील याकरिता प्रत्येक गोष्टीत संयम बाळगा आणि कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नका अशी विनंती आपण आपल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना करा,त्याची आठवण आज काँग्रेसच्या शिस्त मंडळाने पोलीस उपाआयुक्त व पोलीस निरीक्षक सिटी कोतवाली यांना केली.तसेच पोलिस प्रशासनाने सांगितल्या प्रमाणे व आमची देखील ईच्छा आहे,अश्या प्रकारचे कृत्य होऊ नये.आपल्या या अमरावती शहरामध्ये व्यापारी आहेत,सर्वसामान्य माणसाचे जन-जिवन,त्यांचे उत्पन्न याच्यावर या गोष्टींचा आगास होईल अश्या प्रकारची कुठलीही कृती काँग्रेसच्या वतीने केल्या जात नाही आहे.शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता काँग्रेस पक्षाच्या वतीने विजय मिरवणूक सुद्धा काढण्यात आलेली नाही आहे.यासर्व गोष्टींचा आम्ही संयमाने पालन करत असताना,मात्र काल जी घटना घडली त्या ठिकाणी पोलीस प्रशासन हजर होते आणि त्यांच्या पुढे ही घटना घडली व तिथे कुठलीही प्रतिबंधनात्मक कारवाई करण्यात आली नाहीं ही गोष्ट योग्य नाही.जे-जे व्यक्ती असे कृत्य करीत आहेत त्या सर्व व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे.येत्या दिवसांमध्ये यावर कारवाई झाली नाही तर काँग्रेस कार्यकर्ते आणि खा.बळवंत वानखडे यांचे समर्थक यांच्या कडून जर कुठल्या प्रकारची कारवाई झाली तर त्याला संपूर्णपणे जबाबदार पोलीस प्रशासन राहील याची नोंद घ्यावी असे पोलीस उपाआयुक्त व पोलीस निरीक्षक सिटी कोतवाली यांना सांगितले.याप्रसंगी प्रामुख्याने माजी महापौर मिलिंद चिमोटे,प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार,उपाध्यक्ष संजय वाघ,माजी महापौर अशोक डोंगरे,महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे,युवक काँग्रेस अध्यक्ष निलेश गुहे,अल्पसंख्यांक अध्यक्ष अब्दुल रफिक पत्रकार,मुन्ना राठोड,सलीम मिरावाले,अभिनंदन पेंढारी,बी.टी.अंभोरे,भालचंद्र घोंगडे,विजय वानखडे,राजा भाऊ चौधरी,देवयानी कुर्वे,आशा अघम,विद्या गाडे,कांचन खोडके, राजीव भेले,डॉ.मतिन अहेमद,पंकज मेश्राम,समीर जवंजाळ,सुनील जावरे,नितीन काळे,विक्की उर्फ विशाल वानखडे,नाना बारबुद्धे,सुरेंद्र निमजे,संतोष केशरवानी,प्रा.अनिल देशमुख, ऍड.सुनील पडोळे,विकास धोटे,अमर देशकर,लखन यादव,हाजी निसार खान,नितीन ठाकरे,प्रभाकर वाळसे,सुरेश इंगळे,नितीन ठाकरे,मोहम्मद साबीर,रज्जु बाबा बडनेरा,आकाश Iron,मोहम्मद निजाम,नसीम खान पप्पू,सचिन निकम,दिनेश खोडके,शोएब खान,प्रशांत मेश्राम,सुजल इंगळे,अरुण बनारसे यांच्या सह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
मनिष गुडधे.