
उदघाटणानंतर आमदार राजू तोडसाम यांनी घेतला कबड्डी खेळाचा आनंद..
घाटंजी (तालुका प्रतिनिधी) – खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती घाटंजी यांचे तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव व कब बुलबुल मेळावा किन्ही किनारा येथिल जिल्हा परिषद शाळेत उदघाटक आमदार प्रा. राजू तोडसाम यांच्या हस्ते गट विकास अधिकारी श्रीमती वंदना नानोटे यांच्या अध्यक्षतेत पार पडले.
विध्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा व बौद्धिक विकासासोबतच शारीरिक विकास व्हावा या दृष्टीने आयोजित महोत्सवाचे केंद्र स्तरावरून प्रविण्य मिळवलेल्या विध्यार्थी व विध्यार्थिनीच्या स्पर्धा तालुका स्तरावर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन केल्यानंतर आमदार प्रा. राजू तोडसाम विध्यार्थ्यासोबत कबड्डी खेळून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून किन्हीचे सरपंच वामन राठोड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारोती राठोड, गट शिक्षणाधिकारी प्रज्ञा पाटील,विस्तार अधिकारी सुनिल बोन्डे, विशाल साबापुरे, रविंद्र वावरे, अविनाश खरतडे, केंद्र प्रमुख सुनिल यमसलवार, शशिकांत कैलासवार, मिना धोटे, अनिता कुलकर्णी, मुख्याध्यापक रामेश्वर भंडारवार शिक्षक संघटनाचे पदाधिकारी व मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी श्रीमती प्रज्ञा पाटील यांनी केले सूत्रसंचालन भाष्कर वेट्टी यांनी केले तर आभार अभय इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किन्ही किनारा जि.प. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,शिक्षक घाटंजी पंचायत समिती अंतर्गत मधिल शिक्षक व मुख्याध्यापकांनी अथक परिश्रम घेतले. सतत तीन दिवस चाललेल्या महोत्सवाची सांगता बक्षीस वितरणांनी करण्यात आले.











































