Home यवतमाळ एक उमेदवार तीन तीन निवडणूक चिन्हाचा प्रचार

एक उमेदवार तीन तीन निवडणूक चिन्हाचा प्रचार

226

सिलेंडर चा झाला स्फेट त्यातून निघाला चेंडू आणि चेंडू झाला दोन दिवसात मोठा फुटबॉल.

यवतमाळ नुकत्याच होऊन गेलेल्या यवतमाळ नगरपरिषद निवडणूक २०२५ या निवडणुक प्रक्रियेत प्रभाग २३ (अ) वंचीत बहुजन आघाडी या पक्ष कडून उमेदवारी दाखल केलेले विनोद दोंदल हयाच निवडणुकीत तीन वेळा वेगवेगळ्या निवडणूक चिन्हाचा प्रचार केला,
झालेल्या निवडणूक प्रभाग २३ (अ) या प्रभागासाठी विनोद दोंदल यांनी १७ नव्हेंबर वंचीत बहुजन आघाडी या पक्ष कडून नामांकन अर्ज दाखल केला, खरे तर वंचीत पक्षाचे मुख्य निवडणूक चिन्ह सिलेंडर आहे, त्यामुळे विनोद दोंदल दि.१७ ते २६ नव्हेंबर या कालावधीत दहा दिवस सिलेंडर या चिन्हांचा प्रचार केला, २६ नव्हेंबर या तारखेला सर्व अपक्ष उमेदवारांना वेगवेगळे चिन्ह वाटप झाले, वं.ब.आ. पक्षाच्या अध्यक्ष पदाचे उमेदवार काही कारणामुळे किंवा इतर कारणामुळे निवडणूक प्रक्रियेतून बाद करण्यात आले व वं.ब.आ. चे सिलेंडर हे निवडणूक चिन्ह गोठवण्यात आले, त्यामुळे निवडणूक आयोगाकडून दि.२६ नव्हेंबर सकाळी ११ वाजता वं.ब.आ. पक्षांच्या सर्व उमेदवारांना वेगळेवेगळे चिन्ह देण्यात आले,
प्रभाग 23 (अ) चे उमेदवार विनोद दोंदल यांना हया वेळी “चेंडू” निवडणूक चिन्ह देण्यात आले, त्यांनी २६ आणि २७ असे दोन दिवस चेंडू चिन्हाचा प्रचार आपल्या प्रभागात केला, विनोद दोंदल जेचा पचारपत्रक, फलक, पोस्टर ज्या वेळेस प्रिंट करायला गेले त्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर चेंडू हे चिन्ह दिसले नाही, त्यांनी लगेच निवडणूक आयोगाचे कार्यालयात गाठून तिथे निवडणूक आयोगाने लावलेल्या निवडणूक चिन्ह असलेल्या फलकावर चेंडू चिन्ह शोधण्याचा प्रयत्न केला तिथे फलकावर पण त्यांना चेंडू चिन्ह दिसलेस नाही, त्यांनी कार्यालयात मुख्य निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना भेटून चेंडू चिन्ह देण्याची मागणी केली तेव्हा अधिकारी सुद्धा गोधळून गेले, त्यांना सुद्धा आपली चूक लक्षात आली होती, अधिकाऱ्यांना कळून चुकले होते की आपल्या कडून चेंडू चिन्ह देऊन खूप मोठी चुकी आपल्या कडून झाली आहे, कारण चेंडू हे मुळात निवडणूक आयोगाचे निवडणूक चिन्हच नाही आहे, त्यावेळी विनोद दोंदल यांनी काही पत्रकार बोलावून याबाबत पत्रकारांना माहिती दिली की असा-असा प्रकार झाला आहे, तेव्हा पत्रकारांच्या मध्यस्थीने व निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याचा विनंतीला मान देऊन विनोद दोंदल यांनी “चेंडू” या चिन्हांला मिळते जुळते “फुटबॉल” हे चिन्ह दि.२८ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता दिले दिले, पण दोन्ही पत्रकावर एकच २६ डिसेंबर तारीख दिली आहे, तसे निवडणूक आयोगाने आपली चुकी नाही म्हणून विनोद दोंदल यांच्या कडून लिहून घेतले,
हयाच हलगर्जीपणाच्या कारणामुळे विनोद दोंदल यांना निवडुन प्रचार करताना एका – एका घरी तीन – तीन वेळा सर्व प्रभागात फिरून नाहक त्रास सहन करावा लागले, प्रभागात फिरताना त्यांना अनेक ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागला, प्रभाग २३ मधील मतदान जनता विनोद दोंदल याला म्हणायची पहिले तू तुझे ठरवून ये की तुझे कोणते चिन्ह आहे ते, मग आम्ही मतदान तुला मतदान करू, मतदान जनता सुद्धा भ्रमिष्ट झाली होती की विनोद दोंदल यांचे निवडणूक चिन्ह “सिलेंडर”, “चेंडू” की “फुटबॉल” हया पैकी कोणते आहे म्हणून, याच निवडणूक आयोगाच्या गोधळून टाकणाऱ्या चुकीमुळे कदाचित विनोद दोंदल यांना मिळालेले मतदान खूप कमी आहे असा दावा विनोद दोंदल यांनी केला आहे. त्यामुळे प्रभागा २३ (अ) चे मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवर परत घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी साहेब, मुख्य निवडणूक आयोग मुबई, मुख निवडणूक आयोग दिल्ली इथे पत्र देऊन मागणी केली आहे, घडलेले प्रकरण खूपच मोठे असल्यामुळे विनोद दोंदल यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असे त्यांनी अर्जात नमूद केले आहे, जीवाला काही कमीजास्त झाल्यास सर्व प्रशासना मधील प्रकरणाच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी जवाबदार राहील असे त्यांनी सांगितले आहे, न्यायालयात दाद मागण्या करीत मला सर्व प्रक्रियेत कागदपत्रे व प्रभाग २३ मतदान केंद्रातील दि.२० डिसेंबर सकाळी ८ ते ११ हया वेळेतील सीसीटीव्ही (cctv) व्हिडीओ फुटेज तातडीने मिळवून देण्यात यावी, जनेकरून न्यायालयात धाव घेत येईल अशी मागणी त्यांनी केली, जर या प्रकरण्यात न्याय नाही मिळाल्यास विनोद दोंदल शांततामय मार्गाने आंदोलन करणार अशी चेतावणी लिखित स्वरूपात निवेदना द्वारे देण्यात आली.

*यवतमाळ जागरूक जनतेला मदतीचे आवाहन*
(एका जनसेवा करणाऱ्या समाजसेवकाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्व पत्रकार संघटना, वकील संघटना, समाजसेवा संघटना, शासकीय कर्मचारी, उच्चशिक्षित प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर, सर्व यवतमाळ सुजाण नागरिक, विविध राजकीय पक्षातील व्यक्तींनी मदत करावी हे विनंती पूर्व आवाहन केले आहे…)