Home आंतरराष्ट्रीय बुरख्यातील पहिली महिला करणार अंतराळात प्रवास ,

बुरख्यातील पहिली महिला करणार अंतराळात प्रवास ,

267

 

 

तीन सहकाऱ्यांसह निजी एक्स-२ मिशनमध्ये सहभाग ,

सौदी अरब येथील रय्याना बरनावी देशातली पहिली महिला अंतराळवीर ठरत आहे. आज २१ मे हा सौदीसाठी ऐतिहासिक दिवस ठरत आहे. रय्याना बरनावी आपल्या तीन सहकाऱ्यांसह निजी एक्स-२ मिशनमध्ये सहभागी होत आहे.

सौदीतील अनेक महिला आणि तरुणींसाठी रय्याना आदर्श ठरत आहे. ज्या सौदी अरबमध्ये महिलांसाठी कठोर कायदे आहेत, त्याच देशातील एक महिला आता अंतराळाचा प्रवास करणार आहे.
रय्याना बरनावी हिने न्यूझिलंडच्या ओटागो विद्यापीठातून बायोमेडिकलमध्ये पदवी घेतली आहे. तिने सौदी अरबमधून बायोमेडिकल सायन्समध्ये मास्टर्स केलं आहे.

स्तन कॅन्सर आणि स्टेम सेल कॅन्सर विषयात तिने नऊ वर्षे काम केलं आहे. ती आता आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या १० दिवसांच्या मिशनवर जात आहे. ती पहिली मुस्लिम अंतराळवीर ठरणार आहे.
रय्याना बरनावी ही सौदी अरबची पहिली महिला अंतराळ प्रवाशी ठरत आहे. ती आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनसाठी उड्डाण करेल.
बरनावी हिच्यासह या मिशनमध्ये नासाचे माजी अंतराळवीर पैगी व्हिटसन सहभागी होतील. तेच या मिशनचं नेतृत्व करीत आहेत. तसेच अली अकरानी हेही या मिशनमध्ये सहभागी होत आहेत.
बरनावी ही एक्सिओम मिशन २ (एक्स-२) मध्ये स्पेशालिस्ट म्हणून काम करेल. आपल्या पारंपारिक प्रतिमेला छेद देण्यासाठी सौदीने हे मोठं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
आज २१ मे रोजी फ्लोरिडाच्या कॅनावेरल येथील केनडी स्पेस सेंटर येथून सौदीतील वेळेनुसार सायंकाळी ५.३७ वाजता स्पेसएक्स फाल्कन ९ रॉकेटद्वारे उड्डाण करेल