Home बुलडाणा खामगाव येथे देशी कट्टा सह पाच जिवंत काडतूस पकडले..!

खामगाव येथे देशी कट्टा सह पाच जिवंत काडतूस पकडले..!

69

 

ठाणेदार शांतीकुमार पाटील यांची आणखी एक कारवाई

 

एका शाळेच्या तरूणाकडून देशी कट्यासह पाच जीवंत काडतुस जप्त..

अमीन शाह

खामगाव ; शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने शहरालगत असलेल्या वाडी भागातील एका वस्तीगृहातील तरुणाकडून देशी कट्यासह पाच जीवंत काडतुस जप्त करीत आरोपीस अटक केली आहे. आरोपी हा खामगाव येथील एका नावाजलेल्या शाळेचा विद्यार्थी असून तो तालुक्यातील आंबे टाकळी येथे राहणारा आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार, ठाणेदार शांतीकुमार पाटील यांना गुप्त बातमी मिळाल्यावर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासाने,ए एस पी थोरात डी वाय एस पी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पाठवून युवकाला मुद्देमाला सह पकडले याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार परीसरात सन्मती मुलांचे वसतीगृह असून तेथील वस्तीगृहातील रुम नं.205 मध्ये एका तरुणाजवळ देशी कटटा अस़ल्याच्या गुप्त माहितीवरुन पोलीसांनी वस्तीगृह गा़ठून वाँर्डन अमोल विष्णुपंत देवगीरकर वय -40 वर्ष रा.मोरे संकुल वाडी खामगाव यांना तेथे येण्याचे कारण सांगितले़ त्यावरुन अमोल देवगीरकर यांनी वस्तीगृहातील 205 रुमनंबरमध्ये राहत असलेल्या नितीन राजु भगत वय 21 वर्ष रा.आंबेटाकळी ता. खामगांव जि.बुलढाणा याची भेट घालुन दिली़ यावे़ळी पोलीसांनी रुमच्या झडतीचा उददेश समजावुन सांगुन पंचासमक्ष रुममध्ये प्रवेश करून रुमची झडती घेतली असता सदर रुममध्ये लोखडी पलंगाच्या खाली एक काळया रंगाची बॅग संशयास्पद दिसली. सदर बॅग चेक केली असता सदर बेंगमध्ये, काळया रंगाचा एक जिन्सपॅन्ट एक पांढºया रंगाचे फुल बाहयाचे शर्ट,पिवळया रंगाची प्लॅस्टीकची कॅरी बॅग ज्यामध्ये नितीन राजु भगत नावाचे इयत्ता 10 वी चे बोर्ड सर्टीफिकेट,नितीन राजु भगत नावाची कास्ट व्हॅलोडीटी नितीन राजु भगत नावाचे कास्ट सर्टीफिकेट असे कागदपत्र मिळून आले. तसेच बॅगमध्ये पिस्टलच्या आकाराचा एक देशी कटटा ज्याचे बॅरल लोखंडी असून मुठेला दोन्ही बाजुने लाकडी पटटी असून ज्याला मॅक्झीन लागलेली. एका लहान प्लॅस्टीक पन्नीमध्ये एकूण पाच नग जिवंत काडतुस असून त्यापैकी एका जिवंत काडतुस किंमत अंदाजे 10 हजार रुपये मिळून आला त्यास विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली सदरचे अग्नीशस्त्र हे अवैध व विनापरवाना असल्याने ते जप्त करण्यात आले. तसेच नितीन राजु भगत वय 21वर्ष रा. आंबेटाकळी ता.खामगांव याचेवर शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे़