Home महत्वाची बातमी साखरखेर्डा येथे मोठ्या उत्साहात आनंदाई वातावरणात बापाला निरोप ,

साखरखेर्डा येथे मोठ्या उत्साहात आनंदाई वातावरणात बापाला निरोप ,

30

 

 

सचिन मधुकर खंडारे

साखरखेर्डा येथील श्री गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करताना गणरायाला निरोप देण्यात आला . गणपती बाप्पा मोरया , पुढल्या वर्षी लवकर या या गगणभेदी आवाजाने परिसर दणाणून गेला होता .

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दुपारी दोन वाजता श्री शिवाजी व्यायाम शाळेच्या समोर सर्व गणेश मंडळाचे अगमण झाले . सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले गणेश उत्सव मंडळातील कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत मिरवणूकीला प्रारंभ केला , त्या पाठोपाठ अहिल्याबाई होळकर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , परदेशी गणेश उत्सव मंडळ , बालनाथ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , श्री शिवाजी व्यायाम शाळा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , हिंदू सुर्य महाराणा प्रताप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , संत रोहिदास महाराज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , श्री शिवाजी हायस्कूल गणेशोत्सव मंडळ मुख्य मिरवणूकीत सहभागी झाले . ढोलताशांच्या गगणभेदी आवाजाने परिसर दणाणून गेला होता . दगडी मज्जीत , गुजरी चौक , गणपती चौक , धनगर पुरा , माळी पुऱ्यातून मिरवणूक भोगावती नदीवर विसर्जन करण्यात आले . यावेळी शांतता कमेटी सदस्य , तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव , सरपंच सुनील जगताप , शिवसेना तालुकाप्रमुख महेंद्र पाटील, संदीप मगर , तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष मंडळकर , भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य रावसाहेब देशपांडे , माजी उपसरपंच रामदास सिंग राजपूत , ग्राम पंचायत सदस्य संग्रामसिंह राजपूत , मारोती मंडळकर , जालमससिंग राजपूत , भाजपाचे तालुका उपाध्यक्ष गोपाल पाझडे , उद्योजक आशिष बेंदाडे , विकास इंगळे , गोपाल सिंग राजपूत , गोपाल शिराळे , ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ललित अग्रवाल , गणपत अवचार , माजी सरपंच कमलाकर गवई , श्री शिवाजी व्यायाम शाळेचे गजानन इंगळे , फलसिध्द मठाचे विश्वस्त विश्वनाथ अप्पा जितकर , प्रविण पाझडे , कैलास ढोलेकर आशिष कामे यासह सर्व मंडळाचे अध्यक्ष , पदाधिकारी उपस्थित होते . गणेशोत्सव मिरवणूकीत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील , ठाणेदार गजानन करेवाड , यासह दोन पी आय , तीन पी एस आय , पोलीस कर्मचारी , दंगाकाबू पथक , होमगार्ड असा फौज फाटा तैनात करण्यात आला होता .