Home यवतमाळ तलावतील गाळ उपसा न करता देयके लाटण्याचा प्रयत्न…!

तलावतील गाळ उपसा न करता देयके लाटण्याचा प्रयत्न…!

278
झटाळा, घोटी, मारेगाव तलावातील गंभीर प्रकार.
—————————————
घाटंजी (तालुका प्रतिनिधी)
धरणाची साठवण क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढून तो शेतजमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उपलब्ध करून देणे हा ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेचा मुख्य उद्देश ठेवून शासनस्तरावरून लाखो रुपये खर्ची घालून ही योजना राबविल्या जात असून याला घाटंजी तालुक्यातील झटाळा, घोटी, मारेगाव येथिल तलावात केवळ गाळ उपासण्याचे उदघाट्न करण्याचा दिखावा करून गाळ न उपसता देयके लाटण्याचा प्रयत्न करून मोठा भ्रष्टाचार केल्याची लेखी तक्रार ऍड.निलेश चवरडोल यांनी केली आहे.
संबंधित तलावाचे काम एका बहुउद्देशीय संस्थेला दिले गेले असून केवळ दिखावा करण्याच्या दृष्टीने धातूर मातुर उदघाट्नाचे सोपस्कार केले. नंतर याठिकाणी ना बहुउद्देशीय संस्थेचे कर्मचारी फिरकले ना गाळ उपसा करणारी मशीन आली. याशिवाय गंभीर अशी की शासनाचे प्रतिनिधी असलेले कर्मचारी अथवा कोणताही अधिकारी फिरकून किती गाळ उपसा झाला कोणत्या शेतकऱ्याला गाळ देण्यात आले याची चौकशी सुद्धा केली नसल्याचे तक्रारीत असून केवळ भ्रष्टाचार करण्यात धन्यता मानत एका तलावा मागे ४० ते ५० लाख रुपयाचे देयके कसे लाटता येईल यावर भर दिल्याचे दिसून येत आहे.तलावातील गाळ उपसून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही बाब सोडून शासनाच्या निधीचा भ्रष्टाचारयुक्त तलाव युक्ती वापरून शासनाच्या निधीचा उपसा करीत असल्याचे पुढे येत आहे.मौजा झटाळा येथिल तलावाच्या गाळ उपासण्याचे उदघाट्न दिनांक २८ मार्च २०२५ ला केल्याचे जिओ टॅग फोटो उपलब्ध आहे. मात्र गाळ उपसा करण्याचे काम पावसाळा संपल्यानंतर २५ सप्टेंबर २०२५ अर्थात सहा महिन्यानंतर झाल्याचे जिओ टॅग उपलब्ध आहे.या गंभीर बाबीची माहिती माहितीच्या अधिकारात मागितली असता माहिती देण्याचे टाळले असल्याचे सांगण्यात आले असून आपले पितळ उघडे होईल. भ्रष्टाचार निघेल या भितीने माहिती दिली नसेल ना… अशीही शंका याठिकाणी उपस्थित होत आहे.त्यामुळे पावसाला सुरुवात होण्यापूर्वी झटाळा, घोटी, मारेगाव या तलावाची प्रत्यक्षात चौकशी व्हावी व झालेल्या अफरातफरीची चौकशी करून ज्या बहुउद्देशीय संस्थेला काम दिले गेले त्यांचेवर व यातील भ्रष्टाचार युक्त बाबीला खतपाणी घालणारे दोषी कर्मचारी व अधिकारी यांचेवर लवकरात लवकर कडक कारवाई करावी अश्या आशयाची तक्रार घाटंजी येथिल ऍड. निलेश चवरडोल यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेसह राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड व आर्णी केळापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रा. राजू तोडसाम यांना लेखी स्वरूपात देवून मागणी केली आहे.