Home मराठवाडा पोलीस बॉईज असोसिएशनच्या आंदोलनाला आणखीन एक मोठे यश…!

पोलीस बॉईज असोसिएशनच्या आंदोलनाला आणखीन एक मोठे यश…!

393

बॅच क्रमांक 113 व 114 मधील 488 PSI ची API पदी पदोन्नती 

संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांचे पोलीस अधिकाऱ्यांनी मानले आभार !

धाराशिव  ( प्रतिनिधी ) –  बॅच क्रमांक 113 , 114 आणि 115 मधील PSI यांचे API पदी पदोन्नती करण्यात यावी या मागणीसाठी पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली डिसेंबर 2025 मध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर काढण्यात भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले होते आणि गृहराज्यमंत्री श्री.पंकज भोयर यांना निवेदन देण्यात आले होते.

पुढे बोलताना प्रमोद वाघमारे यांनी सांगितले की ,
महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक { PSI } बॅच क्रमांक 113 , 114 , व 115 यामधील अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मागील दोन वर्षापासून सहाय्यक पोलीस निरीक्षक { API } या पदाच्या पदोन्नती करिता माहिती मागवली जात होती , परंतु प्रत्यक्षात अजून सदर तिन्ही बॅचमधील अधिकाऱ्यांची पदोन्नती झालेली नव्हती , बॅच क्रमांक 113 , 114 , व 115 मधील अधिकाऱ्यांना सेवेचा आठ वर्ष हा कालावधी पूर्ण झाला होता , सहाय्यक पोलीस निरीक्षक { API }या पदाची बरीच पदे रिक्त असताना सुद्धा पदोन्नती का दिली जात नव्हती असा प्रश्न प्रमोद वाघमारे यांनी निवेदनात विचारला होता , तसेच जवळपास 700 अधिकारी पदोन्नती पासून वंचित आहेत , 113 बॅच मध्ये 750 अधिकारी असून त्यापैकी सुरुवातीचे 250 लोकांचे प्रमोशन झाले आहे, 114 बॅचमध्ये 230 अधिकारी आहेत तसेच 115 मध्ये एकूण 828 अधिकारी आहेत.. असेही निवेदनात म्हटले होते.
अखेर पोलीस बॉईज असोसिएशनच्या या आंदोलनाला यश आले असून 433 PSI यांची API पदी पदोन्नती झाली आहे.

आता बॅच क्रमांक 115 मधील अधिकाऱ्यांचे लवकरात लवकरच पदोन्नती काण्यात यावी या मागणीसाठी पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे लवकरच आंदोलन करण्यात येणार असून उरलेल्या अधिकाऱ्यांना सुद्धा लवकरच न्याय मिळवून देऊ असे आश्वासन संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी दिला आहे.