Home यवतमाळ अखेर पारवा स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाचे प्रकरण पारवा पोलिसात …

अखेर पारवा स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाचे प्रकरण पारवा पोलिसात …

288

पदाचा गैरवापर करीत अपहार केल्याचा आरोप..
——————————–
घाटंजी (तालुका प्रतिनिधी)
तालुक्यातील पारवा भारतीय स्टेट बँक येथे मे.ताराबाई रामकिसनलाल जैस्वाल पेट्रोलियमच्या रोशनी संदीप जैस्वाल यांचे कर्ज खाते व चालू खाते होते. यात त्यांनी बँकिंग नियमानुसार कर्जाची उचल केली होती सुरवातीची कर्ज हप्ते सुरळीत भरलेही होते.मात्र व्यवसायातील आर्थिक मंदी, बाजारातील प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक नुकसान व तरलतेच्या गंभीर समस्येमुळे कर्ज थकीत राहिले.यातून अर्जदाराकडून पूर्वी देण्यात आलेला धनादेश अनादरीत झाल्याचे दर्शवून अर्जदाराविरोधात एन.आय. ऍक्ट १८८८ अंतर्गत न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली. सदर कार्यवाही दाखल करणे हा बँकेचा स्वतंत्र व स्वखर्चाने करण्याचा कायदेशीर निर्णय होता. मात्र बँकेचे शाखा व्यवस्थापक सतीश भोसले यांनी कारवाईच्या नावाखाली त्यांच्या पदाचा, अधिकाराचा व बँकिंग व्यवस्थेचा गैरवापर करून अर्जदार यांच्या खात्यातून कोणतीही पूर्वसूचना, लेखी समंती, डेबिट आँथोरायझेशन अथवा न्यायालयीन आदेश नसतांना थेट रुपये ९३,००० इतकी रक्कम कोर्ट फीच्या नावाखाली कपात करून अपहार व दिशाभूल केल्याची पारवा पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
. चेक बाऊन्स केस दाखल करण्याचा खर्च कर्जदारावर डेबिट करणे पूर्णपणे चुकीचे आहे. एन.आय. ऍक्ट १८८८ मध्ये तरतूद कुठेही नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.यात अर्जदाराने मिळवलेल्या माहितीनुसार न्यायालयात ४९,६०० रुपये भरले असतांना ईतर खर्चाचा कोणतेही पावती अथवा अर्जदारास माहिती दिली नाही.याबाबत वारंवार विचारणा करून सुद्धा शाखा व्यवस्थापक माहिती देण्यास टाळाटाळ करीत असे असेही तक्रारीत नमूद आहे.यामुळे जैस्वाल यांना शंका बळावल्याने त्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता धक्कादायक बाब पुढे आली की खातेदाराच्या खात्यातून ९३,०००हजार रुपये कपात करून पॅनल वकील यांना वर्ग करण्यात आली होती.यावरून आपली दिशाभूल करून फसगत केली व आपल्या पैश्यांचा अपहार केल्याचा ठपका ठेवत प्रथम क्षेत्रीय प्रबंधक व नुकतेच पारवा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत योग्य योग्य ती कारवाई करण्याची मागणी आपल्या लेखी तक्रारीतून तक्रारदार रोशनी संदीप जैस्वाल यांनी केली आहे. यावर पारवा पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.

Previous article25 हजारांची लाच घेताना महिला लिपिक एसीबिच्या जाळ्यात…!
editor
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.