Home जळगाव प्रेयसीवर गोळी झाडून प्रियकराने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या ,

प्रेयसीवर गोळी झाडून प्रियकराने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या ,

624

 

जळगाव

विवाहित प्रेयसीची
गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर प्रियकराने स्वतःवरही गोळी झाडत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथे प्रेमप्रकरणातून धक्कादायक घटना उघडकीस आली असून प्रेयसीवर गोळी झाडून हत्या केल्यानंतर प्रियकराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अनिता जगदीश पाटील (40) व देवा सुरेश धनगर (40) अशी मृतांची नावे आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?

समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अनिता पाटील आणि देवा धनगर यांच्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले मात्र गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असल्याने रागाच्या भरात देवा धनगर हा अकुलखेडा येथे अनिता यांच्या घरी गेला. त्याने गावठी पिस्टलने अनिता यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना आज शनिवार, 28 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. जगदीश पाटील यांची मुलगी शाळेतून घरी परतल्यानंतर तिने घरात दोघांचेही मृतदेह पाहिले. तीने आरडाओरडा करत शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

मयत संशयीताची दुचाकी जप्त

घटनास्थळी देवा धनगर यांची दुचाकी आढळून आली असून ती पोलिसांनी जप्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोघांचेही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तपास अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर सावळे करीत आहेत. प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या या घटनेमुळे अकुलखेडा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ,