
चिकन च्या एक तूकडया मुळे गेला जीव ,
अमिन शाह
चिकन खाण्याच्या वादातून बारा वर्षीय मुलाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना अमरावतीमध्ये घडली आहे. मावस भावानेच किरकोळ वादातून ही हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच हा घातपात नसून अपघात असल्याचे भासवत खोटी तक्रार दिल्याने मुलाच्या पित्यालाही आरोपी करण्यात आले आहे.
चिकनच्या पीसवरुन वाद…
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमरावतीच्या भातकुली येथे चिकन खाण्याच्या वादातून मावस भावानेच आपल्या 12 वर्षीय भावाची लोखंडी वस्तूने वार करत घरातच त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुरुवातीला अपघाताचा बनाव करून अपघाताची खोटी तक्रार देण्यात आली होती, मात्र पोलिसांनी सखोल तपास करून या हत्येचा उलगडा केला.
जितेराजा गौड वय 12 वर्ष असे मृतक बालकाचे नाव आहे, तर बब्बू गौड वय वर्ष 21 असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मृतक आणि आरोपी हे मध्यप्रदेशचे असून ते कामासाठी भातकुली तालुक्यात आले होते, मृतक मुलाच्या वडिलांनी अपघाताची खोटी तक्रार दिली असल्याने त्यांना सुद्धा यात आरोपी करण्यात आले आहे. घड़लेल्या घटने मुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे ,
पित्यावरही गुन्हा दाखल ,
या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मुलाच्या वडिलांनी सत्य परिस्थिती माहित असूनही पोलिसांकडे अपघाताची खोटी तक्रार दिली. गुन्ह्याची माहिती लपवणे आणि पोलिसांची दिशाभूल करणे या आरोपाखाली पोलिसांनी मृताच्या वडिलांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. सध्या मुख्य आरोपी बब्बू गौड याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.













































