Home यवतमाळ बोटोणी येथील महिला सरपंच सुनीता जुमनाके तथा गावातील महिलांची दारूबंदीसाठी गांधींगिरी

बोटोणी येथील महिला सरपंच सुनीता जुमनाके तथा गावातील महिलांची दारूबंदीसाठी गांधींगिरी

506
यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील बोटोणी येथे कोरोना काळापासून अवैध दारू व्यवसाय तथा वरली मटका जोमात चालू असून त्यावर अंकुश लावन्यासाठी पोलीस प्रशासनाला अपयश आले. अनेकदा सरपंच असो वा गावातील महिलांनी पोलीस स्टेशन मारेगावला निवेदन दिली. मात्र त्यावर ठोस पावले उचलली नसल्याने अवैध धंदे व्यावसायिक राजरोस पणे अवैध दारू व्यवसाय असो वा मटका चालवीत आहे. गावकरी महिला तथा सरपंच तसेच सामाजिक जनता अवैध धंद्या विरोधात गांधींगिरी पद्धतीने आज दिनांक 28 फेब्रुवारी 2026 ला  देशी व विदेशी दारूचे दुकान लावून त्यासोबत चकणा मोफत असे लक्षनीय आंदोलन केले. सरपंच तथा गावातील सामाजिक महिलांनी यवतमाळ वणी महामार्गांवर बोटोणी बसस्टॅण्डवर दारूचे दुकान लावण्यात आल्याने बघ्याची तोबा गर्दी पहायला दिसत होती. गावातील तरुणांनी ढोल ताशाच्या वाजागाजाने अवैध दारू व्यवसायकाच्या घरी धाडी टाकून त्यावर दारू बंद करण्यात यावी यासाठी त्यांना ताकीद देण्यात आली. पोलिस प्रशासनाचे कार्य गावातील जनतेला करावे लागते ही एक पोलीस प्रशासनाला चपराक आहे. उदया कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास पोलीस प्रशासक जबादार राहील असे गावकर्यांकडून ऐकू आले देशी व विदेशी दारूचे दुकानाचे रिबीन कापून उदघाट्न वयस्कर महिला जिजाबाई कोयचाडे यांनी केले.