Home विदर्भ वर्धा,चंद्रपूर- गडचिरोली विधानपरिषदसाठी शिवसेना नेते नितीन दर्यापुरकर यांना उमेदवारीची मागणी…!

वर्धा,चंद्रपूर- गडचिरोली विधानपरिषदसाठी शिवसेना नेते नितीन दर्यापुरकर यांना उमेदवारीची मागणी…!

348
नगरसेवकांची प्रत्यक्ष भेटून मागणी :श्री एकनाथजी शिंदेचे मागणीला सकारात्मक प्रतिसाद

कारंजा (घा) राज्यात सध्या विधान परिषदेचे वारे वाहताना दिसत आहे . वाढत्या तापमानसोबतच राजकीय घडामोडीं सुद्धा सुसाट वेगाने पाहायला मिळत आहे . वर्धा चंद्रपूर -गडचिरोली विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी येत्या दिवसात निवडणूक संपन्न होणार आहे . करिता आर्वी विधानसभा क्षेत्राचे नेते नितीनजी दर्यापूरकर यांच्या उमेदवारी करिता शहरातील सर्व नगरसेवकांनी शिवसेनाप्रमुख उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून विधानपरिषदेच्या उमेदवारीची मागणी केली आहे . वर्धा चंद्रपुर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये भाजपचे आमदार मोठ्या प्रमाणात निवडून आले असल्यामुळे विधानपरिषद शिवसेनेकडे असावी जेणेकरून विदर्भातील संघटनात्मक वाढीसाठी सुद्धा पोषक वातावरण तयार होईल . प्रत्यक्ष भेटीदरम्यान शिवसेनाप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब ,श्री संजयजी राठोड मंत्री श्री किरणजी पांडव ,आर्वी विधानसभा प्रमुख श्री नितीनजी दर्यापूरकर व कारंजा शिवसेना पदाधिकारी व नगरपंचायत उपाध्यक्ष श्री भागवानजी बुवाडे नगरसेवक श्री संजयजी मस्के, श्री राजेंद्रजी लाडके ,श्री विशालजी इंगळे श्री गजानन भिलकर प्रविनजी ढबाले उपस्तीत होते.