Home महाराष्ट्र पत्नीने पतीला नाही दिला जेवणाचा डब्बा त्यावर पतीचा राग अनावर झालं अन...

पत्नीने पतीला नाही दिला जेवणाचा डब्बा त्यावर पतीचा राग अनावर झालं अन , विपरितच घडलं ,

199

पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ,

 

अमीन शाह ,

पती कामाला निघाला  पत्नीने जेवणाचा डबा बनविला नाही म्हणून पती पत्नीचे भांमात्रडण झाले, भांडणाचं रूपांतर मारहाणीत झाल्यावर पतीने पत्नीला जबर मारहाण केली, या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला.
पुण्यातील कोंढवा येथील उंड्रि मध्ये हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी या प्रकरणात आरोपी पती 30 वर्षीय सोमनाथ महादेव पांडगळे याला अटक करण्यात आली आहे.
नेहमी प्रमाणे सकाळी सोमनाथ कामावर जायला निघाला होता, मात्र वेळेवर जेवणाचा डबा तयार झाला नसल्याने सोमनाथ ने पत्नी 27 वर्षीय शीतल सोबत भांडण सुरू केले.

सोमनाथ चा राग अनावर झाल्याने त्याने शीतल च्या डोक्यावर, पायावर लाकडी दांडक्याने मारहाण केली या मारहाणीत ती अर्धमेल्या अवस्थेत होती, नातेवाईकांनी शीतल ला फिट आली म्हणून रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असताना शीतल चा मृत्यू झाला.

डॉक्टरांनी शीतल च्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता तिच्या शरीरावर मारहाणीच्या गंभीर जखमा आढळून आल्या, याबाबत डॉक्टरांनी मृत्यूपूर्वी शीतल ला गंभीर मारहाण करण्यात आली असल्याचे प्रमाणपत्र पोलिसांना दिले.

पोलिसांनी सोमनाथ वर खुनाचा गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली, पुढील तपास कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संतोष सोनवणे, संदीप भोसले व संजय मोगल करीत आहे.