Home मराठवाडा सैलानी बाबा चे दर्शन घेऊन परतणाऱ्या वाहनावर काळाचा घाला 12 भाविक ठार...

सैलानी बाबा चे दर्शन घेऊन परतणाऱ्या वाहनावर काळाचा घाला 12 भाविक ठार ,

134

 

अमीन शाह ,

औरंगाबाद ,

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असून, मध्यरात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील छत्रपती संभाजीनगरजवळ एक भीषण अपघात झाला आहे. दुर्दैवाने या अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून, २० जण जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिनी बस आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री 12.30 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. तर या अपघातात बसचा ड्रायव्हर थोडक्यात बचावला असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सैलानी बाबांचे दर्शन घेऊन नाशिक निफाडकडे जाणारी टेम्पो ट्रॅव्हलर गाडी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली आहे. सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी व इंदिरानगर भागातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघात नेमका कसा झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत. समृद्धीवरील टोल नाक्याजवळ एक ट्रक अचानक समोर आल्याची माहिती अपघातातील बस ड्रायव्हरने दिल्याचीमाहिती पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी दिली आहे. ट्रक कमी वेगात होता की थांबला होता याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. समृद्धी टोल नाक्यावर आरटीओने हा ट्रक थांबवला होता अशीही माहिती आहे. याबाबत सविस्तर चौकशी करुन गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवाणीया यांनी दिली आहे. या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 30 प्रवासी प्रवास करत होते. बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून हे प्रवासी पुन्हा नाशिककडे परतत होते. त्यावेळी हा अपघात झाला आहे. यामध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे.

 

मृतांची नावे : 1. तनुश्री लखन सोळसे (वय ५ ,रा. समता नगर नाशिक) 2. संगीता विलास अस्वले (वय ४०, रा. वणासगाव, निफाड) 3. कांताबाई रमेश जगताप (वय ३८,रा. राजू नगर नाशिक) 4. रतन जमधडे (वय ४५, रा. संत कबीर नगर नाशिक) 5. काजल लखन सोळसे (वय ३२,रा. समता नगर नाशिक) 6 . रजनी गौतम तपासे (वय ३२, रा. गवळणी, नाशिक) 7. हौसाबाई आनंदा शिरसाट (वय ७०, रा. उगाव ता. निफाड जि. नाशिक) 8. झुंबर काशिनाथ गांगुर्डे (वय ५०, रा. राजू नगर नाशिक) 9. अशोक झुंबर गांगुर्डे (वय १८रा. राजू नगर नाशिक) 10. संगीता झुंबर गांगुर्डे (वय ४०,रा. राजू नगर नाशिक) 11. मिलिंद पगारे (वय ५०, रा. कोकणगाव ओझर ता. निफाड जि. नाशिक) 12. दिलीप प्रभाकर केळाणे (वय ४७, रा. बसवंत पिंपळगाव नाशिक)

जखमींची नावे : 1. पूजा संदीप अस्वले, वय ३५ वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक. 2. वैष्णवी संदीप अस्वले, वय १२ वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक. 3. ज्योती दिपक केकाणे, वय ३५ वर्ष, रा. पिंपळगाव,ता.निफाड, जि. नाशिक 4. कमलेश दगु म्हस्के, वय ३२ वर्ष, रा. राहुलनगर, नाशिक. 5. संदीप रघुनाथ अस्वले, वय ३८ वर्ष, रा. तिरुपतीनगर, जेलरोड, नाशिक. 6. युवराज विलास साबळे, वय १८ वर्ष, रा. इंदिरानगर, नाशिक. 7. कमलबाई छबु म्हस्के, वय ७७ वर्ष, रा. ममदापूर, नाशिक. 8. संगीता दगडु म्हस्के, वय ६० वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक. 9. दगु सुखदेव म्हस्के, वय ५० वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक. 10. लखन शंकर सोळसे, वय २८ वर्ष, रा. समतानगर, नाशिक. 11 गिरजेश्वरी संदीप अस्वले, वय १० वर्ष, रा. नाशिक. 12. शांताबाई नामदेव म्हस्के, वय ४० वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक. 13. अनील लहानु साबळे, वय ३२ वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक. 14. तन्मय लक्ष्मण कांबळे, वय ८ वर्ष, रा. पिंपळगाव,ता.निफाड, जि. नाशिक. 15. सोनाली आप्पासाहेब त्रिभुवन, वय २५ वर्ष, रा. वैजापुर 16. श्रीहरी दिपक केकाणे, वय १२ वर्ष, रा. पिंपळगाव,ता.निफाड, जि. नाशिक. 17. सम्राट दिपक केकाणे, वय ६ वर्ष, रा. पिंपळगाव,ता.निफाड, जि. नाशिक.