Home विदर्भ मतदार यादीमध्ये घोळ…!

मतदार यादीमध्ये घोळ…!

115

उमेश सावळकर

 नागपूर – आज लोकसभेच्या पहिल्या फेरीतील मतदानाला सुरवात झाली. मतदान सगळीकडे शांततेत पार पडत आहे तसेच लोकांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून येत होता. परंतु मतदार यादीमध्ये अनेक लोकांचे नाव नसल्याचे लक्षात आले. माझे स्वतःचे नाव मतदार यादीतून गहाळ करण्यात आले. तसेच संपूर्ण नागपूरच्या मतदार यादीत माझे नाव दिसले नाही. काहीही सूचना न देता व सूचना आमच्याकडून न घेता मतदार यादीतून गहाळ कसे झाले हे कोडे अनेकांच्या मनात निर्माण झालेले दिसले. दिघोरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात पाहणी केली असता तेथे अनेकांचे नाव यादीत नव्हते. तसेच एक म्हातारे गृहस्थ नावामध्ये सुधारणा केल्याचे फॉर्म घेऊन आलेले होते. यादीमध्ये त्यांचे त्यांच्या मुलांचे तसेच घरातील सर्व सदस्यांचे नाव होते परंतु त्यांच्या नावापुढे फोटो नव्हता. याकरिता त्यांना मतदान करण्यापासून थांबवण्यात आले. त्यांच्याकडे आधार कार्ड होते त्यावरील व मतदार यादीतील नाव सारखे असल्यामुळे त्यांना मतदान करण्याचा हक्क हिरावून घेण्यात आला. व केंद्रावरील मतदान अधिकारी बुजुर्ग व्यक्तीसोबत अत्यंत मग्रुरीच्या भाषेत बोलत होता. मतदान केंद्रावरील मतदार यादी घेऊन बसलेल्या महिला निवडणूक अधिकाऱ्यांनी सुद्धा स्वतः जाऊन यांचे नाव मतदार यादीत असून यांना मतदान करू द्यावे असे सांगीतल्यावर सुद्धा त्यांना आतील अधिकाऱ्यांनी मतदान करू दिले नाही. हे नियमाबाहेरील कृत्य निवडणूक अधिकारी करतांना दिसले. त्या केंद्रावर भरपूर लोक मतदान यादीत नाव नसल्यामुळे मतदान न करताच परत गेलेले आढळून आले..
शासकीय पातळीवर तसेच स्थानिक प्रशासनान तर्फे लोकांना जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु मतदार यादीतील गोंधळ तपासण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासन तसेच निवडणूक अधिकाऱ्यांची होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून आले. असे असतांना एकूण मतदानाची टक्केवारी कशी वाढेल.