Home विदर्भ आंतरराष्ट्रीय बासरीवादक पंडित निरंजन प्रसाद राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार – 2023-24 चे वाटप…

आंतरराष्ट्रीय बासरीवादक पंडित निरंजन प्रसाद राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार – 2023-24 चे वाटप…

67

नागपूर – शिवशाही फाउंडेशन,भारत व निरंजन धारा,लखनऊ यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय बासरीवादक मा.सौरभ बनौधा याचा बासरीवादनाचा कार्यक्रम महर्षी कर्वे संस्था, हिंगणा येथे आयोजित करण्यात आला.सौरभ बनौधा व ओंकार बनौधा,संस्कार बनौधा,चेतन देब याच्या बासरी व तबलावादनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.

दिवंगत पं. निरंजन प्रसाद यांच्या पुण्यस्थितीनिमित्त दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो.पंडीत जी 1960 ते 2005 या काळातील सर्वात आदरणीय आंतरराष्ट्रीय बासरीवादक होते आणि त्यांनी जगभरात आपली बासरी वादन केले. ते राष्ट्रीय वाद्यवृंद समिती चे सदस्य(भारत सरकार) होते.पंडित निरंजन प्रसाद जी यांनीही हिंदी चित्रपटसृष्टीत बासरीवादनाचे काम केले. त्यापैकी काही प्रसिद्ध हिंदी चित्रपट ‘गुड्डी’, ‘शोर’ इ. आहेत.ते आकाशवाणी लखनौ येथे अव्वल दर्जाचे कलाकार म्हणून कार्यरत होते . बासरीवादन मध्ये सर्वात आदरणीय गुरूंपैकी एक होते. 2013 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ‘पंडित निरंजन प्रसाद राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार’ हा निरंजनधारा,लखनऊ तर्फ दिला जातो. या वर्षी शिवशाही फाउंडेशन,भारत आणि निरंजनधारा,लखनऊ यांच्या संयुक्तमानाने हा पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार सामाजिक कार्य, लेखन, प्रशासन, कला आणि संस्कृती,संशोधन अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पाच मान्यवरांना दिला जातो.आम्ही शिवशाही फाउंडेशन,भारत आणि निरंजन धारा,लखनऊ विविध सामाजिक कामे करतो.उदा.शिक्षण,आरोग्य, आयुर्वेद, योग आणि विकास,पर्यावरण, कला व सांस्कृतिक यांसारख्या क्षेत्रांसह या क्षेत्रांमध्ये सतत कार्यरत असते.यावर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पाच मान्यवरांना व एक विशेष राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो.2023 चे पुरस्कार विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे:- 1.श्री सुनिलकांत सक्सेना – प्रख्यात ●सतारवादक व संगीततज्ज्ञ 2. श्री. राजीवकुमार शुक्ल-प्रसारण 3. डॉ. शशांक कुलकर्णी-नीती आयोग कृषी सल्लागार अधिकारी 4.श्री. अभिजीत पाटील समाजसेवक 5.श्री. रमेशकांत बारो– शिक्षणक्षेत्रात समाजसेवक. 2024 चे पुरस्कार विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे:- 1. डाॅ.विजयसिंह-उपायुक्त, प्रशासन 2.मा.प्रशांत गायकवाड- संगीत 3.राजू शिंदे-समाजसेवक 4.सौ.मधुलिका नाग-संगीत 5.मा.नंदकुमार बिजलगावकर-समाजसेवक विशेष राष्ट्रीय पुरस्कार- प्रा.डॉ.रूपा वर्मा-महिला प्रबोधन व महिला परिचारक शिक्षणक्षेत्रात अतुलनीय कार्य व जनजागरण करणे व त्याच्या प्रश्नावरील उपाय करणे व मार्गे शोधणे , संशोधन अशा अमूल्य कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आला.हे पुरस्कार 31 मार्च 2024 रोजी स्वर्गीय पंडित निरंजन प्रसाद जी यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त घोषित करण्यात आले. 3 एप्रिलला महर्षी कर्वे शिक्षण संस्थेत भव्य पुरस्कार सोहळ्या घेण्यात आला.या कार्याक्रमाचे सूत्रसंचालन सौ.काजल गाठे व निरवानी चौधरी यांनी केले.यावेळी कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय व सीताबाई नरगुंडकर नर्सिग महाविद्यालय गुणवंत विद्यार्थीना प्रमाणपत्र व पदक देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे आंतराष्ट्रीय बासरीवादक श्री.सौरभ बनौधा, संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष बाळाराम माडकर – शिवशाही फाउंडेशन,भारत आणि श्रीमती उर्मिला बनौधा संचालक – निरंजन धारा,लखनऊ सौ. मनू माथूर डेप्टी जनरल मॅनेजर एन.टी.पी.सी,शिक्षण संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीकांत चितळे,श्रीकांत गाडगे,मकरंद करकरे,प्राचार्य रूपा वर्मा, प्राचार्य मिलिंद खानापूरकर, प्रदेश अध्यक्ष डाॅ.सुहास सपाटे, खजिनदार प्रतिक कोडूलकर, सचिव ॠतुराज पाटील,योगेश पाटील, उपाध्यक्ष ऋषिकेश पाटील, गौरव निरंजन,विजेता बनौधा याच्या उपस्थितीत सर्व विजेताना पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी सारंग कुलकर्णी, नकुल कोरडे,अमृता माने व करिष्मा ढोक,तक्षशिला मेश्राम,मनिषा बारापात्रे,महर्षी कर्वे संस्थेचे व्यवस्थापन समितीचे विशेष सहकार्य लाभले..