Home विदर्भ वर्ध्यात राष्ट्रवादी व भाजप दोघांमध्ये लढत…!

वर्ध्यात राष्ट्रवादी व भाजप दोघांमध्ये लढत…!

74

सतीश काळे

शेवटी माजी आमदार अमर काळे यांनी पवार गट राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून बांधले बाशिंग

वर्धा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेसच्याच आजी माजी नेत्यांमध्ये होणाऱ्या संभाव्य लढतीत विद्यमान राष्ट्रवादी कुठेच नसल्याचे चमत्कारीक चित्र पुढे आले आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेसच्याच आजी माजी नेत्यांमध्ये होणाऱ्या संभाव्य लढतीत विद्यमान राष्ट्रवादी कुठेच नसल्याचे चमत्कारीक चित्र पुढे आले आहे. आघाडीच्या जागा वाटपात वर्धा राष्ट्रवादी कॉग्रेसकडे आला. पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या पाठिशी उभे राहणाऱ्या नेत्यांमध्ये वर्धा जिल्हा अव्वल राहला. पक्षाचे सर्वेसर्वा माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, माजी आमदार राजु तिमांडे, सहकारधुरिण सुधीर कोठारी, किशोर माथनकर, अतुल वांदिले ही प्रमुख मंडळी ज्येष्ठ पवारांच्या पाठिशी राहल्याने उमेदवारी या पैकीच एकाला मिळण्याची चर्चा झडली. मात्र या सर्वांच्या आशेवर पाणी फेरून कॉग्रेसचे माजी आमदार अमर काळे हे पक्षाचे उमेदवार झाले. कॉग्रेसतर्फेच उभे राहण्याचे सर्व प्रयत्न फसल्यानंतर जिल्हा राष्ट्रवादीचे तमाम नेते नाराज झाल्याचे चित्र पुढे आले. अमर काळे हे उमेदवार होणार हे जवळपास निश्चित होवूनही घोषणा मात्र होत नव्हती. कारण नाराज नेत्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न झाले. शेवटी या सर्व नाराज नेत्यांना पवारांनी घरी बोलावून चर्चा केली. त्यांची समजूत निघाल्याचे दिसून आल्यावर अमर काळेंना त्याचवेळी पाचारण करण्यात आले. आता राष्ट्रवादीत केवळ दोन दिवसाचे वय असलेल्या काळेंना कधीकाळी राष्ट्रवादीचे दोन वेळा विधान परिषदेचे आमदार राहलेल्या व आता भाजपचे उमेदवार असलेल्या रामदास तडस यांच्याशी लढत द्यावी लागणार वर्धा जिल्ह्यात जातीचे राजकारण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे भाजपचा उमेदवार सरसा ठरणार अशी नागरिक बांधव चर्चा करीत आहे