Home विदर्भ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चंद्रपूर ग्रामीण जिल्हा सचिवपदी दीपक कटकोजवार यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चंद्रपूर ग्रामीण जिल्हा सचिवपदी दीपक कटकोजवार यांची नियुक्ती

14

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष व राज्यसभा खासदार प्रफुलभाई पटेल, पार्टी प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे आदी नेत्यांच्या मान्यतेने चंद्रपूर ग्रामीण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नितीन भटारकर यांनी विद्यमान लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने, जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील परिचीत कार्यकर्ते दीपक कटकोजवार यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चंद्रपूर जिल्हा सचिव पदावर नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. या नियुक्तीबद्दल जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ भटारकर यांचे व मा.अजितदादा पवार सोशल फाउंडेशन चे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष पंकजदादा तंतरपाळे यांंचे दीपक कटकोजवार यांनी आभार मानले आहे. या नव्या नियुक्तीचे राष्ट्रवादी गोटात स्वागत केल्या जात आहे.