Home विदर्भ युवकाने दिव्यांग बांधवाला दिली मायेची ऊब….!

युवकाने दिव्यांग बांधवाला दिली मायेची ऊब….!

15

सतीश काळे

अल्लीपूर . . पवनी या गावांमध्ये दिव्यांक बांधव दबडे एक छोटासा मुलगा आहे तो शाळेमध्ये अल्लीपूरला रोज येने जाने करीतो .बस नआल्यामूळे त्याला गावाला परत जाणे शक्य झाले नाही कारण तो पूर्णतः दिव्यांग आहे त्याला साधं चालता सुद्धा येत नव्हतं तो अल्लीपूर येथील गावातील युवक प्रशांत नांदुरकर यांला दिसताच त्यांनी त्या युवकाला स्वतःच्या गाडीवर बसून घरी नेऊन सोडले दबडे हा युवक अल्लीपूरला शाळेमध्ये रोज येत असतो त्याला पंचायत समितीमार्फत तीन चाकी सायकल अद्यापही दिली गेली नाही त्यामुळे त्याला खूप त्रास सहन करावा लागतो याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन पंचायत समिती मार्फत तीन चाकी गाडी सायकल देण्यात यावी अशी मागणी प्रशांत नांदूरकर हा युवक करीत आहे .
हिंगणघाट तालुक्यामध्ये काही दिवसा अगोदर दिव्यांग बांधवांना अनेक तीन चाकी सायकलचा वाटप करण्यात आला मात्र खरे जे अपंग आहे ज्यांना गरज आहे त्यांना अद्यापही त्या योजनेचा लाभ मिळाला नाही अनेक दिव्यांग बांधव तीन चाकी सायकल पासून वंचित दिसत आहे.