Home महाराष्ट्र “पत्रकार संरक्षण समिती” (महाराष्ट्र) च्या सिंधुदुर्ग जिल्हाकार्य करण्याची मीटिंग सावंतवाडी येथे संपन्न

“पत्रकार संरक्षण समिती” (महाराष्ट्र) च्या सिंधुदुर्ग जिल्हाकार्य करण्याची मीटिंग सावंतवाडी येथे संपन्न

119

पत्रकार संरक्षण समिती (महाराष्ट्र) च्या सिंधुदुर्ग जिल्हाकार्यकारिणीची मीटिंग सावंतवाडी येथे जिल्हाध्यक्ष श्री. प्रसाद मडगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवार दिनांक १२मे २०२३ रोजी दुपारी ठीक ३ वाजता जिल्हा कार्यालय येथे संपन्न झाली.

यावेळी पत्रकार संरक्षण समितीच्या यावर्षी करावयाच्या विविध उपक्रमांवरती नियोजनाचात्मक चर्चा करण्यात आली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकार संरक्षण समितीच्या संघटनात्मक विस्ताराविषयी चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. प्रसाद मडगांवकर, जिल्हा संघटक श्री. जाफर शेख, जिल्हा सचिव श्री. शैलेश मयेकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री. संजय पिळणकर, जिल्हा खजिनदार श्री. नयनेश गावडे, सहसचिव श्री. यशवंत माधव, सह खजिनदार श्री. मदन मुरकर, सौ. सीमंतिनी मयेकर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.