अमीन शाह
आज पर्यंत आपण प्रियकराने प्रेयसीवर वर हल्ला केल्याच्या अनेक बातम्या वाचल्या मात्र येथे प्रियसीने प्रियकरवर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली प्रेमसंबंध असतांना ते सोडून दुसरे लग्न करणाऱ्या वर पुर्वश्रमीची प्रेयसीने चाकूने वार केल्याने प्रियकर गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्या माथे फिरू प्रयसीला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे
ही घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात घडली आहे
तलाठी कॉलॉनीत राहणाऱ्या निलेश बोरसे नामक तरुणाचे एका तरुणीसोबत मागील 2 ते 3 वर्षांपासून प्रेम संबंध होते, मात्र या नात्यात दोघांचे नेहमी भांडण होत होते.
तरुणीने निलेश ला लग्न करण्यासाठी तगादा लावला, मात्र निलेश लग्नासाठी प्रतिसाद देत नव्हता यामुळे संतप्त झालेल्या प्रेयसिने माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला व तुझ्या परिवाराला सोडणार नाही अशी धमकी दिली होती.
मात्र निलेशने प्रेयसीच्या धमकीला प्रतिसाद दिला नाही, यामुळे शनिवारी रात्री च्या सुमारास तरुणी निलेश च्या घरी पोहचली, लग्न करतो की नाही अशी धमकी देत प्रेयसिने निलेशवर चाकूने हल्ला केला, अचानक झालेल्या या हल्ल्यात निलेश घाबरला निलेशला कुटुंबाने तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलिसांनी प्रयसीला अटक केली आहे ,
फोटो सौजन्य , गुगल