Home मराठवाडा अखेर त्या बोगस शिपाईचा घेतला राजीनामा…!

अखेर त्या बोगस शिपाईचा घेतला राजीनामा…!

94

लातूर प्रतिनिधि – ग्रामसेवकची विभागीय खाते चौकशी करण्याचे प्रस्ताव अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या तक्रारीला यश!औसा प्रतिनिधी: ग्रामपंचायत शिवणी (बु.) ता.औसा जि.लातूर येथील संबंधित ग्राम विकास अधिकारी यांनी संगणमत करून स्वतःच्या फायद्यासाठी वर्तमानपत्रात शिपाई पद भरती जाहिरात न देता संगणमत करून दि.1/2/2021 रोजी नामे विजय रमेश खराडे यांची खोटी नियुक्ती दाखवून ग्रामपंचायतच्या प्रोसिडिंग बुक मध्ये प्रत्येक पानावर 2021 हा इ.स.वी.सन खाडाखोड करून सन 2021 ऐवजी 2019 खाडाखोड करून प्रोसिडिंग रजिस्टरच्या पानांमध्ये बदल करून खोटे ठराव दाखवून व सदर खोट्या ठरावावर संगणमत करून सदस्यांची सही घेऊन खोट्या ठरावा आधारे खोटी नियुत्ती दाखवून शासनाची फसवणूक व भ्रष्टाचार केल्याची तक्रार अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी दि.1आक्टोंबर 2021 रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती औसा येथे व वरिष्ठ कार्यालयाकडे अनेक वेळा तक्रार दिल्याने त्याची दखल घेऊन दि.19/01/ 2023 रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जिल्हा परिषद लातूर यांनी असे निर्णय दिले की एकंदरीत ग्रामपंचायत कर्मचारी रमेश खराडे यांची ग्रामपंचायत शिपाई पदासाठी केलेली नियुक्ती ही बनावट दिसून येते ग्रामपंचायत कर्मचारी यांची नियुक्ती करत असताना ग्रामपंचायत कार्यालय शिवणी बु. यांनी अधिनियमातील तरतुदीचे पालन न करता बनावट नियुक्ती केल्याचे सिद्ध होत आहे याबाबतीत सरपंच श्रीमती शोभा धोंडीराम जाधव व ग्रामसेवक निरुडे एस.व्ही. यांना जबाबदार ठरविले असताना देखील बोगस शिपाई यांना नोकरीवरून पदमुक्त करण्यात आले नव्हते त्यामुळे दि.23/3/2023 रोजी ईमेल द्वारे गटविकास अधिकारी पंचायत समिती औसा व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांना तक्रार दिले होते की गटविकास अधिकारी औसा यांनी स्वतःच्या फायद्यासाठी आरोपीशी संगणमत करून उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. लातूर यांच्या आदेशाचे पालन करीत नसल्याने गटविकास अधिकारी यांच्या विरोधात पोलीस सामार्फत गुन्हा नोंद करण्यात यावी अशी तक्रार दिल्याने त्या तक्रारीनुसार दि.1/4/2023 रोजी बनावट शिपाई विजय खराडे यांचा राजीनामा घेतला असून संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांना नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला होता ग्रामसेवक यांचा खुलासा संपर्क नसल्यामुळे त्यांच्यावर विभागीय खाते चौकशी करण्याबाबत कारवाई प्रस्तावित आहे एकंदरीत अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी वारंवार तक्रार, उपोषण, आंदोलन करून त्याचा पाठपुरावा केल्याने अखेर बनावट शिपाई रमेश खराडे यांचा राजीनामा घेण्यात आला.