Home मराठवाडा एक मोठा भाऊ आपल्या लहान बहनी सोबत असा करू शकतो का ???

एक मोठा भाऊ आपल्या लहान बहनी सोबत असा करू शकतो का ???

69

 

 

अमीन शाह ,

बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर शहरात घडली. येथे एका वीस वर्षीय भावाने त्याच्या पंधरा वर्षीय अल्पवयीन सख्ख्या बहिणीवर जीवे मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

जीवे मारण्याची धमकी देत वीस वर्षीय सख्या भावानेच अल्पवयीन बहिणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना गंगापूरमध्ये उघडकीस आली. धक्कादायक बाब म्हणजे, पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले व त्यांच्या पथकानं आरोपीस मनमाड येथून अटक केली आहे.

आरोपी भावाविरोधात गुन्हा दाखल

भावानं आपल्या 15 वर्षीय
अल्पवयीन बहिणीवर गेल्या चार ते पाच महिन्यांत भावाने वारंवार अत्याचार
केले. त्यातून पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. तिचे पोट
दुखायला लागले असता, 9 ऑक्टोंबर रोजी आईनं तिला एका
खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी मुलगी गरोदर
असल्याचं सांगितलं होतं.

त्यानंतर पोट जास्त दुखायला लागल्यानं तिला गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, वैद्यकीय तपासणीत मुलगी दोन महिन्याची गरोदर असल्याची बाब समोर आली. याबाबत गंगापूर पोलिसांनी 20 वर्षीय तरुणाविरोधात बाल लैगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो ) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, त्या तरुणाला मनमाड येथून अटक केली आहे.

पीडित मुलगी रुग्णालयात दाखल

पीडित अल्पवयीन मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचं वैद्यकीय तपासणीतून समोर आलंय. पीडित मुलीला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

– —————– – ———————

अल्पवयीन पीडित बहिणीच्या तक्रारीवरून भावाविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत – ज्ञानेश्वर साकळे, पोलीस उपनिरीक्षक