Home विदर्भ नवस फेडायला पुरण पोळीचा प्रसाद “सर्व भाविक भक्त करतात पुरणपोळीचा स्वयंपाक”

नवस फेडायला पुरण पोळीचा प्रसाद “सर्व भाविक भक्त करतात पुरणपोळीचा स्वयंपाक”

75

सतीश काळे

आजणसरा प्रसिद्ध देवस्थान “नवसाला पावतात श्री संत भोजाजी महाराज”

वर्धा / अल्लीपुर . . हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा हे वीदर्भात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. संत भोजाजी महाराजांच्या कृपाप्रसादासाठी येणाऱ्या भाविकांना पुरणपोळीचा प्रसाद दिला जातो.
संत श्री भोजाजी महाराज हे नावं केवळ वर्धा, यवतमाळ, नागपूरचं नाही तर संपूर्ण विदर्भासह बाहेर राज्यातही प्रसिध्द आहे. भोजाजी महाराजांची आजनसरा या गावाची महती पंचक्रोशीत पसरलेली आहे. कारण इथे भोजाजी महाराजांचा कृपा प्रसाद अनेकांना मिळालेला आहे अशी माहिती येथील पुजारी यांनी दिली आहे.
आजही अनेक भाविक भक्त विदेशातून येथे येत असतात आणि जे दुःखातून मुक्त झालेले आहे रोगातून मुक्त झालेले आहे ते पुरणपोळीचा प्रसाद नैवेद्य म्हणून येथे अर्पण करत असतात. त्यातही महाराजांना पुरणपोळीचा प्रसाद आवडत असल्याने दर बुधवारी आणि रविवारी पाच ते सात हजार किलो डाळीचे पुराण शिजवले जाते. पुरणाचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी दर बुधवारी पन्नास हजारांपेक्षा जास्त भाविकांची मांदियाळी आजनसरा येथे असते. येथे स्वयंपाकासाठी हजारो चुली असतात याचबरोबर पहिले पाट्यावर पुरण वाटल्या जायचे परंतु आता मशीन आली मुळे मशीन वर पुरण वाटल्या जाते या प्रसादाची चवही न्यारीच आहे .
भावी भक्त मोठ्या श्रद्धेने श्री संत भोजाजी महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी येतात दर बुधवार व रविवारला जणू काही जत्राच आदनसरामध्ये असते.