Home जालना व्यापाऱ्यांसह नागरिकांकडून तृतीयपंथी व्यक्ती जर बळजबरीने वसुली करत असतील तर कारवाई करण्याचा...

व्यापाऱ्यांसह नागरिकांकडून तृतीयपंथी व्यक्ती जर बळजबरीने वसुली करत असतील तर कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा…

174

घनसावंगी / लक्ष्मण बिलोरे

– घनसावंगी तालुक्यातील बाजारपेठेच्या गावात व्यापाऱ्यांसह नागरिकांकडून तृतीयपंथी व्यक्ती जबरदस्तीने पैसे वसूल करून अरेरावी ,अपमानास्पद भाषा वापरत असतील तर सदरिल तृतीयपंथी व्यक्तींवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा घनसावंगी पोलिसांनी दिला आहे.या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, कुंभार पिंपळगांव, तीर्थपुरी,राणी उंचेगाव,रांजनी,घनसावंगी येथील आठवडी बाजारात सुमार मेकअप करून तृतीयपंथी व्यक्ती अवतरतात.व्यापारी,नागरिक यांना वेठीस धरून प्रत्येकी शंभर ते पाचशे रुपयांपर्यंत वसुली करतात.कुणी दहा,वीस रूपये दिले तर व्यापारी,नागरिकांचा अपमान करून गलिच्छ भाषा वापरतात.आठवडी बाजारातून दर खेपेला ५० ते ६० हजार रूपयांची वसुली करतात.हा प्रकार अत्यंत संतापजनक असून हा एकप्रकारे तृतीयपंथी व्यक्तींकडून दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यासारखाच प्रकार समजला जात आहे.एक तर बाजारपेठेत मंदीची लाट असल्याने अनेक व्यापाऱ्यांना दुकानभाडे देणेही अवघड झालेले आहे. अशी बाजारपेठेची अवस्था असतांना व्यापाऱ्यांनी तृतीयपंथी व्यक्तींना २००,५०० रूपये कुठून द्यायचे.बळजबरीने अशाप्रकारे हप्ता वसूली कुणाच्या आशिर्वादाने चालते ?कायद्याने अशाप्रकारे बळजबरीने वसूली करण्याचा परवाना आहे का ? असे अनेक प्रश्न व्यापाऱ्यांसह नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत.

*पोलिस कारवाई करणार*
-सहसा व्यापारी कुणी दानधर्म करा अशी याचना करत असेल तर एकही व्यापारी खाली हात कुणाला पाठवत नाहीत.स्वखुशीने दहा,वीस रूपये देतातच.परंतु तृतीयपंथी व्यक्ती जबरदस्तीने व्यापाऱ्यांसह नागरिकांना लुटत आहेत.तृतीयपंथी व्यक्ती जबरदस्तीने करून मागतील तेवढेच पैसे द्यावे लागतात नाहीतर विचित्र हातवारे करून हे लोक अश्लील भाषेत बोलून व्यापाऱ्यांसह नागरिकांचा अपमान करतात.व्यापाऱ्यांकडून कायद्याने अशी जबरदस्तीची वसुली कुणी करू शकत नाही. घनसावंगी तालुक्यातील बाजारपेठेच्या गावात ज्या तृतीयपंथी व्यक्तींनी अशारितीने जबरदस्तीने पैशाची वसुली केली आहे.त्यांची चौकशी करून कायदेशिर कारवाई करण्यात येईल,असा इशारा घनसावंगी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आनंद साबळे यांनी दिला आहे.