Home पालघर आम आदमी पार्टी चे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..

आम आदमी पार्टी चे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..

46

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना इडीने अटक केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 28 मार्च 2024 रोजी करण्यात आले. आप रायगड च्या वतीने खोपोली येथे लोहाणा समाज हॉल येथे उत्साहात रक्तदान शिबीर पार पडले.

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ सामाजिक उपक्रम राबवून आगळावेगळा कार्यक्रम राबविण्यात आला.रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे या शिबिरात भाग घेतला.
सदर उपक्रमाच्या आयोजनात रायगड जिल्हाध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,उपक्रम प्रमुख शिवा शिवचरण,दिपक कांबळे,प्रसन्न त्रिभुवन,प्रवीण कोल्हे,सुमन शर्मा यांनी अथक मेहनत घेतली.
रक्तदान श्रेष्ठ दान आहे.रक्तदान करून समाजाप्रती महान कार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानताना दिल्ली येथे दिनांक 31 मार्च 2024 रोजी हुकूम शाहीच्या निषेधार्थ रामलीला मैदान येथे विशाल रॅली सोबत जाहीर सभेद्ववारे निषेध नोंदविला जावून अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेसाठी संपूर्ण भारतातून आपच्या वतीने जोरदार प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आपचे जिल्हाध्यक्ष डॉ.शेखर अलका तुळशीदास जांभळे यांनी केले आहे.