Home पालघर सहज सेवा फाऊंडेशन आयोजित पाताळगंगा नदी कृतज्ञता व पूजन उत्साहात संपन्न…

सहज सेवा फाऊंडेशन आयोजित पाताळगंगा नदी कृतज्ञता व पूजन उत्साहात संपन्न…

71

नववर्षानिमित्त नदी संवर्धन करण्यासाठी उपक्रम…

खोपोली शहरातून वाहणारी पाताळगंगा नदी.जिच्यामुळे नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.संपूर्ण तालुक्यात इंडस्ट्रीजचे जाळे पसरले आहे. त्यांचा विकास झाला आहे.या नदीमुळे नागरी जीवन सुखकर होत आहे, विकास होत आहे. मातृतुल्य असणार्‍या या मातेची योग्य ती काळजी जनतेने घ्यायला हवी म्हणूनच पाताळगंगा नदीचे ऋण मानून भविष्यात मिळालेल्या या निसर्गाच्या वरदानाचे चांगल्या प्रकारे जतन कसे करता येईल या संदर्भात जागरूकता करण्याचा प्रयत्न सहजसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून सोमवार दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी खोपोली येथील गगनगिरी आश्रम समोरील नदी भोवतालचे पटांगण येथे संपन्न झाला.
खोपोली येथील उगम पावणाऱ्या या नदीपात्राबद्दल प्रशासनाने जागृत राहून वाया जाणाऱ्या पाण्याचे जतन केले पाहिजे. या नदीवर शहराच्या सौंदर्यात भर घालणारे सुशोभीकरण राबवायला पाहिजे यासाठी जनसामान्यात जागरूकता येण्यासाठी आपली नदी, आपली जबाबदारी मानून उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. खोपोली व तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद लाभलेल्या या उपक्रमात मुंबई पुणे व इतरत्र आलेल्या पर्यटकांनी निखळ आनंद घेतला.
यावेळी नदी भोवतली दिवे लावून नदी प्रती संकल्प करण्यात आला.नदीपात्रात केलेली रोषणाई लक्षवेधक होती.

गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात सातत्यपूर्ण योगदान देणाऱ्या सहज सेवा फाउंडेशनच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे नागरिकांनी भरभरून कौतुक केले असून दर महिन्यात खोपोलीतील विविध नदी घाटावर पौर्णिमेच्या दिवशी पूजन करण्यात येईल असाही संकल्प करण्यात आला.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहजसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,उपक्रम प्रमुख हितेश राठोड,दिवेश राठोड, उबेद पटेल, ह्रितिक मयेकर, उपाध्यक्षा इशिका शेलार,सचिव अखिलेश पाटील,खजिनदार संतोष गायकर,जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी,महीला संघटक निलम पाटील,तालुका प्रमुख मोहन केदार,मार्गदर्शक नरेंद्र हर्डीकर,सल्लागार राजेंद्र फक्के,नम्रता परदेशी,बनिता सहा सीमा कोशे,तुषार अगरवाल यांनी अथक मेहनत घेतली. तसेच या कार्यक्रमप्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली तसेच आनंद शाळा येथील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नकुल देशमुख यांनी केले.