Home पालघर ते दोघे चिकन बिरयानी खायला गेले अण , विपरिच घडले हो ,...

ते दोघे चिकन बिरयानी खायला गेले अण , विपरिच घडले हो , ?

668

 

अमीन शाह ,

चिकन बिरयानी खातांना एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. मुलीच्या घशात चिकनचा तुकडा अडकला. ज्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि ही समस्या वेगाने वाढत गेली. त्यानंतर मुलीला रुग्णालयात नेण्यात आले. पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तरुणीचा मृत्यू झाला. मुलीच्या घशात चिकनचे हाड अडकले. ज्यामुळे तिला श्वास घेता येत नव्हता. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार एक तरुणी आपल्या प्रियकरासोबत एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेली होती. तिथे त्या लोकांनी चिकन बिर्याणी ऑर्डर केली. चिकन बिर्याणीची ऑर्डर आली आणि दोघेही मोठ्या चवीने बिर्याणी खाऊ लागले. यावेळी ते खूप आनंदी दिसत होते. पण त्याच दरम्यान, बिर्याणी खाताना या तरुणीच्या घशात चिकनचं हाड अडकलं. घशात हाड अडकल्याने तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. हे चिकनचं हाड बराच वेळ तिच्या घशात अडकून होतं. श्वास घेता येत नसल्याने काही वेळात ती बेशुद्ध पडली.
तिची अशी परिस्थिती पाहून तिचा प्रियकर तिला तात्काळ रुग्णालयात घेऊन गेला. मात्र तोपर्यंत फार उशीर झालेला होता. रुग्मालयात डॉक्टरांनी या तरुणीला तपासून मृत घोषित केले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणाची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी रुग्णालय गाठलं. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अशा प्रकारे मुलीचा मृत्यू झाल्याने कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीयेत.
या प्रकरणाची माहिती देताना पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी सांगितले की, मृत मुलगी 27 वर्षांची होती. आता अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहोत. अहवाल आल्यानंतर, मुलीचा मृत्यू चिकनचं हाड घशात अडकल्याने झाला की त्यामागे काही कट होता हे स्पष्ट होईल. यासोबतच, कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा झाला आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.