Home जालना पिंपळगाव रेणुकाई येथे शाहरुख खान ने वाचवले कृष्णाचे प्राण

पिंपळगाव रेणुकाई येथे शाहरुख खान ने वाचवले कृष्णाचे प्राण

217

 

अमिन शाह

सध्या देशभरामध्ये अनेक ठिकाणी हिंदू मुस्लिम वाद होताना आपल्याला बघावयास मिळत असते.राजकारणी आपल्या फ़ायद्या साठी हिन्दू आणि मुस्लिम समाजात दूरी निर्माण करीत आहे परन्तु अशा परिस्थितीमध्ये अनेकदा हिंदू-मुस्लिम ऐक्याची उदाहरणे देखील पाहायला मिळतात. यातून आपल्या देशातील हिंदू-मुस्लिम ऐक्य अधिक प्रबळ होताना दिसून येते असेच एक उदाहरण घडले आहे. भोकरदन तालुक्यातील पिपळगाव रेणुकाई येथील दुर्गादास नरवाडे या शेतकऱ्याचा अकरा वर्षीय इयत्ता पाचवी मध्ये शिकणारा कृष्णा नावाचा मुलगा शेततळ्या मध्ये पाय घसरून पडला. कृष्णाला पडताना पाहून शेजारील शेतामध्ये काम करत असलेला शाहरुख खान पठाण हा
तरुण या मुलाला वाचवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता धावत येऊन शेत तळयात उड़ी घेऊन त्याला वाचवींन्या साठी प्रयत्न करू लागल यात त्याला सार्थक नामक मुलाची साथ मिळाली त्या मुलाला वाचवण्यासाठी तरुणांनी आपल्या जिवाची पर्वा न करता शेततळ्यामध्ये उडी घेतली आणि कृष्णाला सुखरूप बाहेर काढले. यावेळी परिसरात काम करत असणाऱ्या शेतक-यांनी देखील धावत येऊन कृष्णाला तात्काळ सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. आणि सुदैवाने कृष्णाला जीवनदान मिळाले आणि कृष्णाचे प्राण वाचले. कृष्णा त्याच्या आई-वडिलाना एकुलता एक मुलगा आहे आई वडिलांनी शाहरुख आणि सार्थकचे आभार मानले. या घटनेमुळे आता या तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाहरुख आणि
सार्थकचे पिपळगाव रेनुकाई ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच, उपसरपंचासह, ग्रामपंचायत
सदस्य, कृष्णाचे आई-वडील आणि सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.