Home यवतमाळ वंचित स्वबळावर निवडणुका लढवणार..डाॅ.नीरज वाघमारे..

वंचित स्वबळावर निवडणुका लढवणार..डाॅ.नीरज वाघमारे..

143

यवतमाळ दि. ९ ऑक्टोबर..यवतमाळ नगर परिषद, जिल्हा परिषद, आणि पंचायत समितीच्या निवडणुका नजीकच्या कालावधीमध्ये संपन्न होणार आहेत. त्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडीने आपली राजकीय भूमिका निश्चित केली आहे.

हा वंचिताचा आणि बहुजनांचा पक्ष असल्यामुळे या निवडणुकांमध्ये सामान्य कार्यकर्त्यांना सत्तेत प्रतिनिधित्व मिळण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार केला जाणार आहे.
कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या नेत्यांच्या निवडणुका नसून तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उमेदवार निवडीचे व समविचारी पक्षाशी युती करण्यासंबंधीचे अधिकार जिल्हाध्यक्षांना दिले असल्यामुळे पक्षाच्या तळागाळातील निष्ठावंत आणि अठरापगड जातीतील कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यास प्राधान्य असणार आहे.
वंचित बहुजन आघाडी सर्वच जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार असून समविचारी पक्षाकडून जर युतीचा सन्मानजनक प्रस्ताव आल्यास युतीचा मार्ग मोकळा राहील, असे डॉ.नीरज वाघमारे, जिल्हाध्यक्ष-वंचित बहुजन आघाडी यवतमाळ यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट करताना जाहीर केले आहे.
या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव- शिवदास कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष- विशाल पोले, शहर महासचिव- प्रमोद पाटील, शहर संघटक-सुधीर खोब्रागडे, शहर उपाध्यक्ष-विलास वाघमारे, शैलेश भानवे,नामदेव इंगोले,दीपक नगराळे, नितेश पाटील-शाखा अध्यक्ष,उत्तमराव कांबळे, पुष्पा शिरसाट, करुणा मून,करुणा चौधरी, मीना रणीत, शोभना कोटंबे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.