Home विदर्भ विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रमाकांत कोलते

विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रमाकांत कोलते

198

यवतमाळ – विदर्भ साहित्य संघ शाखा जांब आणि ईश्वर फाउंडेशन दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ आणि २ नोव्हेंबर २०२५ रोजी होऊ घातलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या ६९ व्या संमेलना अध्यक्ष पदी यवतमाळ येथील प्रा. डॉ. रमाकांत कोलते यांची निवड करण्यात आली आहे.

त्यांची निवड होताच जांब यवतमाळच्या शाखेने नवनियुक्त संमेलनाध्यक्षांच्या निवासस्थानी
जाऊन शाखाध्यक्ष तथा जांब येथील सरपंच सौ सोनाली पुरुषोत्तम टिचुकले यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला.
संमेलना अध्यक्ष पदाचा मान यवतमाळला मिळाल्याबद्दल यवतमाळच्या साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
डॉ. रमाकांत कोलते यांचा यवतमाळच्या सामाजिक साहित्यिक आणि शैक्षणिक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग राहिला आहे १९९७ साली संपन्न झालेल्या विदर्भ साहित्य संघाच्या ४९ व्या संमेलनाचे ते मुख्य शिल्पकार होते तसेच २०१९ साली त्यांच्या नेतृत्वात यवतमाळ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले.
त्यांच्या निवडीबद्दल,ईश्वर फाउंडेशन चे प्रतिनिधी मुख्य आयोजक हेमंतकुमार कांबळे, कार्याध्यक्षl मनोहर शहारे, शाखाध्यक्ष सौ.सोनाली टिचुकले, निखिल आडे, सौ शुभांगी बोरखेडे,पुरुषोत्तम टिचूकले,सौ विद्या खडसे, जनार्दन राठोड, लक्ष्मीप्रसाद वाघमोडे सर,अक्षय शहाडे, अश्विन यादव, नरेंद्र पाटणे सुधाकर पाटील,जोगेश्वर वाईकर, विनोद राठोड, आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.