Home जालना कामगार संघटनेचा दणका,फसवणूक प्रकरणातील बिळात लपून बसलेले चोरं बाहेर निघू लागले…!

कामगार संघटनेचा दणका,फसवणूक प्रकरणातील बिळात लपून बसलेले चोरं बाहेर निघू लागले…!

408

जालना/ लक्ष्मण बिलोरे

बहुचर्चित मैत्रेय फसवणूक प्रकरण मुंबई कोर्टात एका निर्णायक मोडवर येवून ठेपलेले आहे,त्याचे कारण म्हणजे मैत्रेय पिडित गुंतवणुकदार आणि एजंट यांची कामगार संघटनेच्या माध्यमातून झालेली एकजूट आणि त्यांनी संघटनेच्या कामकाजावर ठेवलेला विश्वास यामुळे हे प्रकरण कोर्टात यशस्वी होत असून या प्रकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. कोर्ट आणि सक्षम प्राधिकारी अधिकारी यांच्या संयुक्त कामकाजातून पिडितांना परतावे मिळणार आहेत ‘अशी माहिती मैत्रेय गुंतवणुकदार आणि प्रतिनिधी कामगार संघटनेच्या अध्यक्षा संगीता कदम यांनी दिली.

१९९८ साली ठाणे शहरात स्व. मधुसुदन सत्पाळकर यांनी मैत्रेय सर्व्हिसेस प्रा.लि.कंपनीची स्थापना करून संचालक मंडळाच्या माध्यमातून उद्योग समुह सुरू केला.ज्यामध्ये जनतेने आर्थिक गुंतवणूक करायची आणि ठराविक कालावधीत सव्याज परतावे मिळवायचे.मधुसूदन सत्पाळकर यांच्या प्रामाणिक प्रयत्नाला यशही मिळाले, अल्पावधीतच मैत्रेय उद्योग समुहाने भरारी घेतली.दरम्यान, २००३ मध्ये मधुसूदन सत्पाळकर यांचे आकस्मिकपणे निधन झाले आणि मैत्रेय उद्योग समुहात चोरांचा सिरकाव सुरू झाला.स्व.मधुसूदन सत्पाळकरांची विधवा पत्नी वर्षा सत्पाळकर आणि संचालक मंडळ यांनी २०१५ -१६ पर्यंत मैत्रेयच्या माध्यमातून कोट्यावधीची मालमत्ता जमवली.मैत्रेय सर्व्हिसेस अंतर्गत गुंतवणूकदारांच्या नावे प्लाट करण्याच्या कंपनीच्या धोरणावर सेबीने आक्षेप घेतल्यानंतर मैत्रेय समुहातील सिएमडि,संचालक मंडळ,सिनियर प्रतिनिधी यांनी संगनमताने खऱ्या अर्थाने गुंतवणूकदारांची फसवणूक करायला सुरूवात केली.मैत्रेय सर्व्हिसेस नंतर मैत्रेय प्लाटर्स & स्ट्रक्चर्स, मैत्री सुवर्णसिद्धी …अशी वेगवेगळी नाव बदलून गुंतवणूकदारांची दिशाभूल करत सामुहिक आर्थिक घोटाळा करणे सुरू ठेवले आणि २०१६ मध्ये देशभरातील शाखा एकाच दिवशी बंद करून गुंतवणूकदारांना खड्डयात ढकलले.मैत्रेय सिएमडी वर्षा सत्पाळकर आणि संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाले.मैत्रेय सुरू असतांना लोकांना भुलथापा देवून पैसा जमा केला यापुढे गुंतवणुकदारांना कसलेही सहकार्य न करता तोंड बंद ठेवावे यासाठी मैत्रेयशी हातमिळवणी करण्याच्या बदल्यात मालमत्ता नावे करून घेणारे सिनिअर प्रतिनिधी या फसवणूक प्रकरणात मागील ८-९ वर्षे बिळात लपून बसले होते. मुंबई कोर्टात २०२२ मध्ये कामगार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष संगिता कदम यांनी मैत्रेय फसवणूक प्रकरणी केस ११४८/२०२२ दाखल केली आणि या प्रकरणाला दिशा मिळत गेली.कोर्टाच्या आदेशान्वये मैत्रेय मालमत्ता जप्तीचे आदेश विखुलेल्या मालमत्तेचे शोध कार्य,फसवणूक प्रकरणातील आरोपींचा तपास करणे .दरम्यान, मैत्रेय फसवणूक प्रकरणात गुंतवणूकदारांना फसविण्यात प्रत्यक्ष सहभागी असलेले आणि मैत्रेय मॅनेजमेन्टशी हातमिळवणी करणारे सिनीयर प्रतिनिधी यांच्या नावे मालमत्ता खरेदी केलेल्या असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने मागील ८-९ वर्षे बिळात लपून बसलेले मैत्रेय सिनिअर प्रतिनिधी कार्यवाहीच्या भितीने बाहेर पडू लागले आहेत.आणि त्यांच्या नावे असलेली मैत्रेय मालमत्ता कोर्टात जमा करत असल्याची माहिती समोर आली आहे. मैत्रेय मालमत्ता नावावर असतांनाही सदर मालमत्ता जमा न केल्यास ,याकामी दिरंगाई केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. असे संकेत मैत्रेय गुंतवणूकदार संघटनेने दिले आहेत.