Home जळगाव बहनीचा दुसऱ्या जातीच्या मुलावर प्रेम जडलं अन , भावांच्या हाथुन विपरितच घडलं...

बहनीचा दुसऱ्या जातीच्या मुलावर प्रेम जडलं अन , भावांच्या हाथुन विपरितच घडलं ?

142

 

अमीन शाह ,

अंतर जातीय प्रेमसंबंधाच्या कारणावरून दोन भावांनी आई-वडील यांच्या चिथावणीवरून बहिणीची निर्गुण हत्या केली आहे. ही घटना जामनेर तालुक्यातील तोंडपूर शिवारात घडली घडलेल्या या घटने मुळे परिसरात खळबळ उडाली आहे ,

या संदर्भात प्राप्त माहिती नुसार या घटनेतील फिर्यादी याचा भाऊ रहीम शाह व मृतक चन्द्रकला हिचे गेल्या अनेक वर्षा पासून प्रेम सबंध होते लग्न करण्यासाठी हे दोघे सुरत ला ही पळून गेले होते मात्र गावातील लोकांनी समजूत घातल्या मुळे हे दोघे परत आले होते

१६ सप्टेंबर रोजी सकाळी फिर्यादी शमीम शाह हे नेहमीप्रमाणे शेडवर काम करत असतांना सकाळी ९ वाजेच्या सुमारास धोंडीबा बावस्कर यांची मुलगी चंद्रकलाबाई ही पळतच फिर्यादीच्या शेडवर आली व म्हणाली की, माझे भाऊ, आई- वडील हे मला मारुन टाकणार आहेत. मला वाचवा. मला तुम्ही कोठेतरी लपवा असे बोलत होती. तेव्हा फिर्यादीने तिला बकऱ्यांच्या शेडमध्ये लपण्यासाठी सांगीतले. ती शेडमध्ये बकऱ्यांमध्येच लपली होती. तेवढयात तेथे मयत चंद्रकला हिचे भाऊ कृष्णा व शिवाजी बावस्कर असे दोघेजण पळतच आले. फिर्यादीला पकडुन चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांचे दोघांचे हातामध्ये कुऱ्हाडी होती. तेव्हा शिवाजी व कृष्णा असे दोघांनी चंद्रकलाबाई लपलेल्या शेडमध्ये जावुन पाहिले. तेव्हा कृष्णा याने चंद्रकला हीला बकऱ्यांमधुन ओढले व त्याचे हातातील कुऱ्हाडीने चंद्रकला च्या डोक्यात स्पा सप वार करून तीला जीवे ठार मारले. फिर्यादीने धोंडीबा बावस्कर यांच्या हाताला झटका मारुन तेथुन पळुन गावाकडे पळत आला. त्यानंतर भाऊ, वडिलांसह फिर्यादीने पहूर पोलीस ठाणे गाठले. नंतर, सदरची घटना ही पोलीस ठाणे फर्दापूर हद्दीतील असल्याने फिर्यादी शमीम शाह याने तेथे फिर्याद दाखल केली. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. माहिती मिळताच फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. संशयित सर्व आरोपी मयत चंद्रकला हिचे भाऊ कृष्णा धोंडीबा बावस्कर, शिवाजी धोंडीबा बावस्कर, वडील धोंडीबा सांडु बावस्कर, आई शेवंताबाई धोंडीबा बावस्कर यांना अटक करण्यात आली आहे सदर घटने चा तपास एपीआय भारत मोरे हे करीत आहे घडलेल्या घटने मुळे परिसरात खळबळ उडाली असून एकच चर्चा केली जात आहे ,