Home मुंबई टुरिस्ट हॉटेल अंमली पदार्थ विकणाऱ्यांचा अड्डा? “परिसर ड्रग्स मुक्त करा अन्यथा DCP...

टुरिस्ट हॉटेल अंमली पदार्थ विकणाऱ्यांचा अड्डा? “परिसर ड्रग्स मुक्त करा अन्यथा DCP कार्यालयावर मोर्चा. :- डॉ. राजन माकणीकर

122

मुंबई दि (प्रतिनिधी) पवई परिसरात ड्रग्स चा सुळसुळाट वाढला असून टुरिस्ट हॉटेल ड्रग्स माफियाच्या वास्तव्याचे केंद्र बनले की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मागील काही महिन्यांपासुन आपल्या राज्यात ड्रग्स माफियान्नी हैदोस माजवीला आहे.
मुंबई महाराष्ट्र येथील पवई परिसरात मोरारजी नगर, फिल्टर पाडा, गौतम नगर, भीम नगर, निटी, पेरू बाग, चिंधी चाल पोलीस बीट दोन नंबर वार्ड क्रमांक 121 आदी ठिकाणी ड्रग्स चे जाळे पसरले असल्याचे दिसून येत आहे.

विहार लेक परिसरातील असलेल्या बहुतांश हॉटेल्स मध्ये मुले-मुली ड्रग्स घेऊन शय्या गरम करत असल्याचे समजून येत आहे. नव्हे असेही समजते की टुरिस्ट नावाच्या हॉटेल मध्ये ड्रग्स चे व्यापारी आपली ठिय्या मांडून बसलेले असतात आणि त्याला आश्रय हॉटेल चा चालक रवी शेट्टी देतो. त्यामुळे रवी शेट्टी याची मागील 3 महिन्यापासूनची इन आणि आऊट गोइंग कॉल्स डिटेल्स मागवून त्याची चौकशी करण्याची मागणी येथील काही समाजसेवकांनी केली आहे.

टुरिस्ट हॉटेलच्या चालक श्री रवी शेट्टी याचे दोन्ही मोबाईल क्रमांकाची ची मागील 6 महिन्यापासूनची कॉल्स रेकॉर्डिंग तपासून घ्यावी त्या मध्ये ड्रुग्स संबंधित गुंड लोकांचे कॉल्स व CC TV मध्ये त्यांचे हॉटेलात असलेले वास्तव्य दिसून येईल. यात हॉटेल मालकाला काहीही न माहिती होता केवळ रवी शेट्टी हा काही पोलिसांना मॅनेज करून ड्रग्स माफियाना आश्रय देत असल्याचे समजून येत असल्याची तक्रार नार्कोटिक्स डिपार्टमेंट ला समजभूषण विद्रोही पत्रकार, पॅन्थर, डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकारी गस्तीला गेली असता हातमीलवणी केलेली भ्रष्ट पोलीस आधीच हॉटेल ला टीप देतात. त्यामुळे वरिष्ठान्ना रांगेहाथ पकडणे अवघड जातं आहे. पण मर्जितील पोलिसांना विस्वासात घेऊन पाकिटांच्या जोरावर परिसरात ड्रग्स चे जाळे पसरवले आहे. नुकतेच काही पोलीस अधिकारी व शिपाई यांच्याकडून ड्रग्स चा चार्ज ही काढून घेतला असल्याची माहिती डॉ. माकणीकर यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना दिली.

या ड्रुग्स मुळे स्थानिक युवकांचे हाल होत आहेत, आई बहीण व बायकोचे मंगळसूत्रे चोरून विकून ही लोक आपली नशा भागवत आहेत. बऱ्याच लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत शिवाय तरुण भारत असाच तर नसे मध्ये चूर झाला तर देशाचे भविष्य फार अंधःकारात जाईल अशी भीती डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केली.

शेजारीच परीक्षा केंद्र आहे भारतीतील संपूर्ण सुशिक्षित युवा वर्ग कानाकोपऱ्यातुन येथे विद्यार्थी परीक्षेसाठी येतात. अश्यात याच क्षेत्रातून ड्रुग्स सम्पूर्ण भारतात विद्यार्थ्यांच्या हातून जाण्याची शक्यता नाकारता येनार नाही. उद्या हाच परिसर ड्रुग्स चे मुख्य केंद्र म्हणुन उभे राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. लवकरात लवकर परिसर ड्रग्स मुक्त नाही केला तर हजारोच्या संख्येने मा. DCP कार्यलयावर मोर्चा काढू असाही इशारा देशव्यापी संविधान जनजागृती व साक्षरता अभियान चे राष्ट्रीय आयोजक डॉ. राजन माकणीकर यांनी दिला .