लवकरच विदर्भातील नावांची होणार घोषणा ,
टीम पोलीसवाला ,
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. या घोषणेनंतर असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) पक्षाने आपल्या तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. ही उमेदवारांची घोषणा पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केली.
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील, बिहार राज्यातील किशनगंजमधून अख्तरुल इमान तर स्वत: असदुद्दीन ओवेसी तेलंगणामधील त्यांच्या पारंपारिक मतदारसंघ हैदराबादमधून निवडणूक लढवणार आहेत.
सध्या अख्तरुल इमान हे बिहार विधानसभेचे आमदार आहेत.इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगराचे खासदार आहेत तर ओवेसी हे मागील २० वर्षांपासून हैदराबादचे खासदार आहेत.
लोकसभा २०२४ निवडणूकांसाठी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) पक्ष बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा या राज्यात उमेदवार देणार आहे. तेथे लवकरच उमेदवार घोषित करण्यात येतील. इम्तियाज जलील यांनी सांगितले की महाराष्ट्रात ६ जागांवर निवडणूक लढवणार आहे त्यात मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धुळे याशिवाय महाराष्ट्राच्या पूर्व भागातील विदर्भ मतदारसंघातून उमेदवार देणार आहे. बिहारमधील ११ जागांवर एआयएमआयएम आपले उमेदवार देणार आहेत.