
“रोजा म्हणजे केवळ उपाशी राहणे नाही – हाजी रिजवान जड्डा ,
तौसिफ शेख ,
लोणार ,
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पवित्र रमजानच्या निमित्ताने महाराष्ट्र जमियते उलमा ए हिंदच्या वतीने राज्याध्यक्ष हाफिज़ नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुक्ती रोशन शाह कासमी यांच्या मार्गदर्शनाखाली १२ ते १८ मार्च २०२४ दरम्यान लोणार जमियते उलमा ए हिंदने लोणार तालुक्यातील सर्व मशिदीमध्ये रोजदारांसाठी यावर्षी ५०० किलोग्राम पेंड खजूर आणि ३०० लिटर रूहअब्जा शरबतचे वाटप केले.
*काय आहे रमजान आणि रोजा चा अर्थ?*
इस्लाम धर्मानुसार अरबी वर्षातील ९व्या महिन्याला म्हणजे उपवासाच्या महिन्याला रमजान म्हणतात. या काळात इस्लाम धर्माचे लोक उपवास ठेवतात उपवास केल्याने सर्व पापांची क्षमा होतो अशी धारणा आहे. ‘रोजा’ या शब्दाला अरबी भाषेत ‘सौम’ म्हणतात ज्याचा अर्थ स्वतःवर नियंत्रण ठेवणे असा होतो, उपवास म्हणजे थांबणे स्वतःवर नियंत्रण ठेवणे असेही म्हणता येईल. रोजा म्हणजे केवळ उपाशी राहणे नसून त्यापेक्षा अनेक नियम पाळावे लागतात यात डोळे कान आणि तोंडावर ही बंधने येतात. कोणतेही वाईट ऐकले जात नाही किंवा कोणतेही अपशब्द वापरली जात नाही. या महिन्यामध्ये जास्तीत जास्त गरजू लोकांना मदत करण्यात येतो, अशी माहिती यावेळी लोणार जमीयतचे तालुकाध्यक्ष हाजी मो. रिजवान जड्डा यांनी दिली.
लोणार तालुक्यातील सर्व मशिदींमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन खजूर आणि शरबत वाटप करण्यामध्ये लोणार जमीयतचे कार्यकर्ते रिजवान खान करामत खान, मौलाना शफीयुद्दीन मिल्ली, साबीर अली, हाजी ईक्रामुद्दीन, हाजी नजीर खान, हाजी शेख वहाब सह इतर सर्व कार्यकर्त्यांनी आपला मोलाचा वाटा लावला.












































