
सिंदखेडराजा तहसीलदार व किनगाव राजा ठाणेदार यांना सह आरोपी करण्याची मागणी !
ठाणेदार मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन !
प्रा दिलीप नाईकवाड
बुलढाणा
जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड राहेरी येथील अवैध रेती वाहतुकीच्या संदर्भामध्ये राहेरी येथील ग्रामस्थ उपोषणाला बसलेले असताना वार्तांकनासाठी गेलेले युट्युब चॅनेल चे जेष्ठ पत्रकार रामदास कहाळे यांच्यावर अवैध रेती माफीयांचे वार्तांकन का करत आहे टिप्पर चे फोटो का घेत आहे म्हणून काही अवैध रेती वाहतूक करणाऱ्या गावगुंडाने तसेच संबंधित ठेकेदारांनी मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता ‘ यासंदर्भामध्ये साखरखेर्डा येथे दिनांक 22 मे रोजी ठाणेदार गजानन करेवाड यांच्यामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले ,
सदर निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की
आम्ही पत्रकार संघटनेचे सर्व सदस्य या निवेदनाद्वारे आपले लक्ष एका गंभीर घटनेकडे वेधत आहोत.दि. १९/०५/ २०२६ रोजी मौजे – राहेरी दुसरबीड येथे कर्तव्य बजावत असतांना आपल्या तालुक्यातील पत्रकार * रामदास कहाळे यांचेवर काही समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला केला.या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून ही घटना अत्यंत संतापजनक व लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला घालणारी आहे.
पत्रकार हे समाजातील सत्य, भ्रष्टाचार आणि जनसामान्यांचे प्रश्न जनतेसमोर आणण्याचे काम अविरतपणे करीत असतात.मात्र अलिकडच्या काळात समाजकंटक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून पत्रकारांना लक्ष करण्याचे प्रमाण वाढले आहे.अशा हल्ल्यांमुळे पत्रकार जगतात भितीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
** आमच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत***
(१) पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना व त्यांना पाठीशी घालणाऱ्या सूत्रधारांना तात्काळ अटक करण्यात यावी.
(२)*कठोर कायदेशीर कारवाई* –आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत ( Maharashtra Media Persons & Media Institution Act) तसेच अन्य अजामीनपात्र कलमांनुसार कडक गुन्हे दाखल करण्यात यावेत.
(३) * विशेष खटला*:- हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा होईल याची खात्री करावी.
(४) * पत्रकार संरक्षण*:- कर्तव्य बजावत असतांना पत्रकारांना पोलिस प्रशासनाकडून योग्य ते संरक्षण पुरविण्यात यावे.जेणेकरून पत्रकार निर्भिडपणे काम करू शकतील.
•• तेव्हा पोलिस प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेत २४ तासांचे आत आरोपीवर ठोस कारवाई करावी .
अन्यथा पत्रकार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.व यांची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे .
सदर निवेदनावर ज्येष्ठ पत्रकार अशोक इंगळे
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप नाईकवाड,’ज्येष्ठ पत्रकार डी.एन.पंचाळ ,सचिन खंडारे,प्रतापराव मोरे, प्रल्हाद देशमुख,पवन मगर,भगवान साळवे,
वसिम शेख,
एस.पी.शिगंणे,जुबेर शहा,विजय देशमुख,
समाधान सरकटे, ‘डॉ.गंगाराम उबाळे,
समाधान मस्के पाटील,
यांच्या सह्या आहेत .













































