Home यवतमाळ सायफळ पैनगंगा नदीपात्रात रेती तस्करांचा धुमाकूळ सुरूच…

सायफळ पैनगंगा नदीपात्रात रेती तस्करांचा धुमाकूळ सुरूच…

356

किनवट तालुक्यातील तस्करावर कारवाई ची गरज

कंपनीच्या हद्दीतून होते वाहतूक

घाटंजी तालुक्यातील विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील सायफळ येथिल पैनगंगा नदीपात्रातून रेतीचे अैवध उत्खनन सुरूच असून दररोज शेकडो ब्रास रेतीचे उत्खनन करून गोविंदपुर ते सायफळ गावाच्या मधात असलेल्या अहील्यानगर धनगरबेडा येथे रेती साठा जमा केल्या जाते तिथून पहाटे च्या सुमारास लगतच्या किनवट तालुक्यातील उनकेश्वर मांडवी लिंगी येथे बिनधास्तपणे तस्करी केली जात आहे सायफळ येथिल पैनगंगा नदीपात्रात सुरू असलेल्या उच्च पातळी बंधा-याच्या कामाजवळ मोठ्याप्रमाणात रेती असल्याने सायफळ येथिल चार ते पाच अट्टल रेती तस्कर चाळीस ते पन्नास मजूर लावून पैनगंगा नदीपात्रातून दिवसा रेतीचे उत्खनन करून लगतच रेती साठा जमा करून सदर साठ्याची विल्हेवाट सायंकाळ च्या सुमारास लगतच्या किनवट तालुक्यातील गावात करीत असतात सदर रेतीचे वाहतूक हे उच्च पातळी बंधा-याच्या कंत्राटदाराच्या हद्दीतून होत असून सदर कंपनीने रेती उत्खनन होत असल्याबाबत तलाठी मंडळ अधिकारी यांना माहीती देणे गरजेचे आहे मात्र त्या कंपनी कडून कुठलीही माहिती तलाठी मंडळ अधिकारी यांना देत नसल्याने सदर कंपनीच्या कामकाजावर संशय व्यक्त केले जात आहे सदर कंपनीने रेती तस्करी रोखण्यासाठी रस्ता बंद करणे गरजेचे आहे मात्र कंपनीने रस्ता बंद करीत नसल्याने तस्करांना संधी मिळत आहे दिवसभर रेतीचे अैवध उत्खनन करणा-या मजूरावर फौजदारी कारवाई केल्यास रेती तस्करी ला आळा बसेल असे मत नागरीक व्यक्त करीत आहे किनवट तालुक्यातील तस्करावर कारवाई होत नसल्याने हे तस्कर बिनधास्तपणे रेतीची लगतच्या किनवट तालुक्यात वाहतूक करीत आहे सायफळ पैनगंगा नदीपात्रातून किनवट तालुक्यातील उनकेश्वर मांडवी येथे अैवध वाहतूक होत असतांना मांडवी व उनकेश्वर येथिल तलाठी मंडळ अधिका-यांकडून का कारवाई केली जात नाही आहे असा प्रश्न नागरीक उपस्थित करीत आहे याकडे घाटंजी तहसीलदारासह किनवट तहसिलदारांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.