Home वाशिम प्रवासी महिलेच्या दागिन्या ची पर्स चोरणाऱ्या करणाऱ्या महिलेस पोलिसांनी केली अटक

प्रवासी महिलेच्या दागिन्या ची पर्स चोरणाऱ्या करणाऱ्या महिलेस पोलिसांनी केली अटक

25

रिसोड पोलीसांची तत्परता आणि विशेष कामगीरी;चोरी गेलेला 6,12,800/- रु चा माल जप्त

फुलचंद भगत
वाशिम:-गुन्ह्यातील/ फिर्यादी सुनंदा बळीराम धांडे वय 59 वर्ष रा. कमलानगर ता. शहापुर जि. ठाणे ह्या त्यांचे रिसोड येथील नातेवाईक नामे प्रकाश पंढरी मोरे यांचेकडे आल्या होत्या त्या दि. 20/05/2026 रोजी परत गावी
ठाणे जिल्ह्यात जाण्यासाठी बस स्टँड रिसोड येथे अंदाजे 12/00 वा. आल्या असता व काही वेळातच त्यांनी
त्यांची पर्स उघडी दिसली तर त्यांनी पर्स तपासुन पाहीली असता पर्समधील एक लहान पर्स ज्यामध्ये सोन्याची
एक पोत,दोन कर्नफुले, एक अंगठी, व नगदी 2800/- रु. तसेच मोबाईल असा एकुण 6,12,800/- रु. चा माल
दिसला नाही.
रिसोड पोलीसांना सदर घटनेची माहीती मिळताच पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी एक पथक बस स्टँड परीसरात CCTV फुटेज चेक करण्यास पाठविले व पो. नि. रामेश्वर चव्हाण हे स्वता स्टाफ सह
घटनास्थळाला भेट देवुन सायबरच्या मदतीने तांत्रीक व आधुनि पद्धतीने मोबाईल संबंधाने माहीती घेवुन व
गोपनिय माहीतीच्या आधारे शेनगांव जि. हिंगोली असा पाठलाग करुन शेनगांव ते खिल्लार जाणा-या संशयीत
खाजगी प्रवाशी वाहतुक करणारे वाहने व वाहनातील प्रवाशी चेक केले असता त्या वाहनापैकी एका वाहनामध्ये
एका महीलेच्या चेह-याच्या हावभावावरुन संशयीत रीत्या दिसुन आली वरुन तीचे नाव गाव विचारले असता तीने तीचे नाव वत्सला दगडु तुरुकमाने वय 60 वर्ष रा. काहकर ता. शेनगाव जि. हिंगोली असे सांगीतले. सदर महीलेस तेथील इतर महीलेच्या हस्ते चेक केले असता त्या महीलेजवळ रिसोड बस स्टैंड वरुन चोरी गेलेली पर्स व त्यामधील एक सोन्याची पोथ, एक अंगठी, दोन कानातील झुंबर, नगदी 2800/- रु. व मोबाईल फोन असा ऐवज एकुण अंदाजे किंमत 6,12,800/- रु. चा माल मिळुन आल्याने पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात आली
आहे.सदर कार्यवाही नंतर पिडीता/फिर्यादी वयोवृद्द महीलेचा चेह-यावर आनंद ओसांडुन आला व फिर्यादी
फिर्यादीचे नातेवाईकांनी वाशिम पोलीस दलाचे विशेष आभार मानले व यापुढे आमचा प्रत्येक पोलीसांबद्दलचा
आदर नेहमीच उंचावत राहील असे उद्गार काढले व रिसोड पोलीसांनी घटनेचे गांभीर्य समजुन तात्काळ दखल
घेवुन न्याय दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे-पाटील,अपर पोलीस अधिक्षक श्रीमती लता फड मँडम, मा. सहा. पोलीस अधिक्षक नवदिप अग्रवाल यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.
रामेश्वर चव्हाण, पोउपनि सचिन गोखले, पोउपनि रामेश्वर नागरे, पोहेकाँ प्रशांत राजगुरु, पोकाँ विनोद घनवट, पोकाँ
रवी अडागळे, हेमंत सरकटे, निवोद मस्के, परमेश्वर भोणे, मपोकाँ वृषाली ढगे, सुषमा गायकवाड पोलीस स्टेशन
रिसोड तसेच पोकाँ किशोर इंगोले पोलीस स्टेशन सायबर वाशिम यांनी केली आहे.

Previous articleपत्रकारावर हल्ल्याप्रकरणी पत्रकार संघटनांचे निवेदन!
editor
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.