
दोषींवर कारवाईची मागणी; आंदोलनाचा इशारा ,
प्रा दिलीप नाईकवाड बुलढाणा
जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड राहेरी येथील वाळू घाटावर वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकार रामदास कहाळे यांच्यावर वाळू वाहतूकदार कंत्राटदार व त्यांच्या साथीदारांनी दि १९ मे रोजी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी पत्रकार संघटनांनी बुधवारी दि २० मे रोजी उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांना निवेदन देत मारहाण करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
पत्रकार कहाळे हे वाळू घाटावरील घडामोडींचे लाईव्ह वार्तांकन करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच पीडित पत्रकारावरच किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने पत्रकारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.मारहान करणाऱ्या
दोषींना तात्काळ अटक करावी व पत्रकारावरील खोटा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी सिंदखेडराजा पत्रकार संघटनांनी केली असून सदर निवेदनावर मुकुंद पाठक ,नंदू वाघमारे, गजानन मेहेत्रे राहुल झोटे, देवानंद झोटे भगवान साळवे, विजय भालमोडे, बुद्धू चौधरी, शेख जाकेर,सुरेश हुसे, ज्ञानेश्वर बुधवत,छगन झोरे, रफिक शेख,अनिल दराडे,रवी ढवळे,याच्यासह तालुक्यातील १६ अधिक पत्रकारांच्या सहया आहेत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.













































