Home बुलडाणा अवलिया विदेही संत हरेराम बाबा यांच्या पावन स्पर्शाने दुमदुमली देऊळगाव मही नगरी

अवलिया विदेही संत हरेराम बाबा यांच्या पावन स्पर्शाने दुमदुमली देऊळगाव मही नगरी

277

श्रीक्षेत्र रंगनाथ बाबा यांच्या मठा पर्यंत रथ गाडीत व टाळ मृदुंगाच्या निघाली दिंडी

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगाव मही:-महाराष्ट्र ही संतांची पावन भूमी आहे.अशा या पावन भूमी मध्ये अवलिया संत म्हणून परिसरात प्रसिद्ध असलेले हरेराम बाबा यांचे देऊळगाव मही येते रंगनाथ महाराज विश्रांती मठ येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त भेटी प्रसंगी आले असता या ठिकाणी परिसरात भक्तांची मोठी मांदियाळी दिसून आली मोठ्या उत्साहात हरेराम बाबा यांचे देऊळगाव मही नगर वासीयांनी फटाक्याच्या अतिश बाजीने स्वागत केले.रंगनाथ महाराज मठा पासुन बसस्टैंड चौक, विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर, श्रीराम मंदिर परिसरातून श्रीक्षेत्र रंगनाथ बाबा यांच्या मठा पर्यंत रथ गाडीत व टाळ मृदुंगाच्या मिरवणूक गावातून काढण्यात आली. ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत व रांगोळी काढत हरेराम बाबा यांच्या मिरवणूकीचे स्वागत केले
जालना जिल्ह्यातील वडगाव वखारी तांडा येथील अवलिया विदेही संत हरेराम बाबा महाराज परिचित असून बाबाचा मोठा भक्त वर्ग त्यांचा या परिसरात आहे त्यागी संत म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे हरेराम बाबा देऊळगाव मही नगरीत प्रथमच आल्याने परिसरातील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त बाबांच्या दर्शनासाठी उपस्थितीत होते त्यांच्या स्वागतासाठी दत्तात्रय शिंगणे,सुधीर आप्पा मुंगसे, पुरुषोत्तम शिंगणे, रमेश शिंगणे, नितीन जोशी, योगेश जोशी, किरण शेळके,ह भ प प्रल्हाद महाराज सोरमारे, ह भ प हिम्मत रायते, ह भ प गणेश महाराज शेळके, शिवहारी कुटे, गजानन जोशी व सर्व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले व दर्शनाचा आनंद घेतला.